Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अनिल देशमुखांचा बळी दिला जातोय, राजा आणि वजीर पुढे येत नाहीत’, प्रकाश आंबेडकरांचा इशारा नेमका कुणाकडे?

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी खळबळजनक दावा केलाय. अनेल देशमुख एका प्रकरणात फसल्याचं दिसत आहे. त्यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये. त्यांनी गोळा केलेले पैसे कुणाला नेऊन दिले हे त्यांनी सांगावं. तेव्हा ते माफीचे साक्षीदार होऊ शकतात, असं आंबेडकर म्हणाले.

'अनिल देशमुखांचा बळी दिला जातोय, राजा आणि वजीर पुढे येत नाहीत', प्रकाश आंबेडकरांचा इशारा नेमका कुणाकडे?
प्रकाश आंबेडकर
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 1:50 PM

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सत्र न्यायालयाने दिलेल्या न्यायालयीन कोठडीला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर देशमुख यांची पुन्हा एकदा 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी खळबळजनक दावा केलाय. अनेल देशमुख एका प्रकरणात फसल्याचं दिसत आहे. त्यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये. त्यांनी गोळा केलेले पैसे कुणाला नेऊन दिले हे त्यांनी सांगावं. तेव्हा ते माफीचे साक्षीदार होऊ शकतात, असं आंबेडकर म्हणाले. (Prakash Ambedkar criticizes Anil Deshmukh and Devendra Fadnavis)

कलेक्शन झालं पण तो पैसा अनिल देशमुख यांच्याकडे नाही. मग तो पैसा कुठे गेला हे त्यांनी सांगावं. अनिल देशमुख यांचा बळी दिला जात आहे. राजा आणि वजिर मात्र पुढे येत नाहीत, असा दावा करतानाच राज्यपालांनी याचा विचार करावा, असं आवाहनही आंबेडकर यांनी केलंय. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नवाब मलिक यांनी जमीन घेतल्याचं माहिती होतं. तेव्हा कारवाई का केली नाही? आपल्यावर शेकल्यानंतर त्यांनी हे प्रकरण बाहेर काढलं. एक प्रकरण दाबण्यासाठी हे प्रकरण काढलं, असा आरोपही आंबेडकर यांनी केलाय. न्यायालयाने राजकीय गुन्हेगारी केसेसचा निकाल लावावा, असंही आंबेडकर म्हणाले.

अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंगप्रकणी 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीची मुदत शनिवारी संपत असल्यानं त्यांना काल कोर्टात हजर केलं असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. अनिल देशमुख यांना ईडी कोठडी द्यावी, अशी अंमलबजावणी संचलनालयाची मागणी होती. ईडीनं आता सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतल्यानंतर अनिल देशमुख यांना पुन्हा ईडी कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

ऋषिकेश देशमुख यांना दिलासा नाही

दुसरीकडे ईडीनं अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना गुरुवारी (5 नोव्हेंबरला) हजर होण्याचं समन्स दिलं होतं. मात्र, त्यांनी ईडीसमोर हजर होण्याऐवजी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, ऋषिकेश देशमुख यांचा अटकपर्व जामीन फेटाळण्यात आलाय.

इतर बातम्या :

अखेर फडणवीसांनी बॉम्ब फोडला! मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून जमीन का खरेदी केली? फडणवीसांचा मलिकांना सवाल

शरद पवारांना पुरावे देणार, त्यांनाही कळू द्या मंत्री काय कांड करतात: देवेंद्र फडणवीस

Prakash Ambedkar criticizes Anil Deshmukh and Devendra Fadnavis

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.