2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील पहिला उमेदवार जाहीर
बुलडाणा : वंचित बहुजन आघाडीतर्फे बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आलाय. बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळीराम शिरस्कार यांना बुलडाणा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. शेगाव येथील वंचित माळी समाज राजकीय एल्गार परिषदेमध्ये बोलताना भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केली. वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेसची चर्चा सुरू असून आघाडीबाबत निर्णय अद्याप झालेला नाही. प्रकाश […]
बुलडाणा : वंचित बहुजन आघाडीतर्फे बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आलाय. बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळीराम शिरस्कार यांना बुलडाणा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. शेगाव येथील वंचित माळी समाज राजकीय एल्गार परिषदेमध्ये बोलताना भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केली.
वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेसची चर्चा सुरू असून आघाडीबाबत निर्णय अद्याप झालेला नाही. प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा करत लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील पाहिला उमेदवार बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचा जाहीर केलाय.
भारिप बहुजन महासंघाचे बाळापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर झाली आहे. राज्यातील लोकसभेचा पहिला उमेदवार जाहीर करत आंबेडकर यांनी राजकीय पक्षांना एक प्रकारे धक्का दिलाय. माळी समाजाकडून मागणी केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी हे चक्र आता तुम्ही फिरवले असून हे चक्र असंच सुरू ठेवण्याचा सल्लाही त्यांनी भाषणात दिला.
प्रथमच लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यावर आमदार बळीराम शिरस्कार यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली. त्यांनीही ही उमेदवारी स्वीकारली आहे. गेल्या 15 वर्षांपासून हा जिल्हा विकास कामांपासून दूर राहिलेला असून जिल्ह्यातील विकासकामे करण्यासाठीच ही उमेदवारी असल्याचं त्यांनी म्हटलंय. पुढील काळात जे समीकरणे बदलतील, तेव्हाही आंबेडकर यांचा आदेश जो येईल तो स्वीकारणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
बुलडाणा लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे खासदार आहेत. आमदार बळीराम सिरस्कार हे माळी समाजाचे असून माळी कार्डसोबतच एमआयएम, भारिप वोट बँक ही बहुजन वंचित आघाडीची जमेची बाजू आहे. तर आंबेडकरांनी आमदार सिरस्कार यांची उमेदवारी जाहीर करून काँग्रेसला हा मोठा धक्का दिलाय.