AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्हाला रोगाशी लढायचंय, रोग्याशी नाही, कॉलर ट्यूनवर प्रकाश आंबेडकरांचा आक्षेप

प्रकाश आंबडेकर यांनी कोरोनाकाळात प्रत्येकाच्या मोबाईलवर वाजत असलेल्या कॉलर ट्यूनवरुन आक्षेप घेतला. Prakash Ambedkar objects corona caller tune

आम्हाला रोगाशी लढायचंय, रोग्याशी नाही, कॉलर ट्यूनवर प्रकाश आंबेडकरांचा आक्षेप
Follow us
| Updated on: Jun 25, 2020 | 1:30 PM

सोलापूर : वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी कोरोनाकाळात प्रत्येकाच्या मोबाईलवर वाजत असलेल्या कॉलर ट्यूनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. “तीन महिने झाले कोरोनाचा हॅलो ट्यून वाजतेय. प्रत्येक मोबाईलच्या माध्यमातून भीती दाखवले जात आहे. या मागे काय षडयंत्र आहे हे पंतप्रधानानी बोलावे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. (Prakash Ambedkar objects corona caller tune)

कोरोनाच्या निमित्ताने शासनाने सर्वसामान्य लोकांना ब्लॅकमेल केलं आहे. एकलकोंडी जीवनास भारतीय जनता पक्षाने सुरुवात केली आहे, असाही आरोप प्रकाश आंबडेकर यांनी केला.

कोरोनापेक्षा जास्त लोक टीबीने दगावले होते, टीबीच्या वेळेस लॉकडाऊन झालं नव्हतं. कोरोनामुळे लॉकडाऊन झालं त्यामुळे अनेक जण उपाशी आहेत, रोजगार बंद आहेत. सर्वसामान्यात कोरोनाची रिंगटोन लावून भीती निर्माण केली जात आहे, 3 महिने झाले तरी रिंगटोन बदलली नाही, यामागे काय षडयंत्र आहे हे मोदींनी सांगितल्याशिवाय कळणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

शासनाने आपल्याला ब्लॅकमेल केलं, जीवन उध्वस्त केलंय, 30 तारखेची वाट न बघता सामान्य आयुष्य जीवन जगायला सुरुवात करा, असे माझे आवाहन आहे. आरोग्य विभागाने आम्हाला जगवलं, लॉकडाऊनमुळे नाही, लॉकडाऊनमुळे अनेक लोक मानसिक रुग्ण झाले, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

मोदींवर खुनाचा गुन्हा दाखल करा – आंबेडकर

हे सरकार कंगाल आहे, केंद्र आणि राज्य सरकार भिकारी सरकार आहेत. त्यामुळे जगात तेलाच्या किमती पडलेल्या असताना तेलाचे भाव वाढलेत, ही नवीन चोरी आहे, हे सरकार संघटित गुन्हेगारांचे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणून कार्यक्रम केला, त्यामुळे कोरोनचा शिरकाव झाला, पंतप्रधानांवर 302 चा गुन्हा दाखल केला पाहिजे, असा घणाघात आंबेडकरांनी केला.

सर्व ठिकाणी पालकमंऱ्यांचा हस्तक्षेपामुळे परिस्थिती बिघडली, जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात अधिकार दिले पाहिजेत, असा सल्ला त्यांनी दिला.

(Prakash Ambedkar objects corona caller tune)

संबंधित बातम्या

ना नेतृत्व, ना दूरदृष्टी, ना निर्णय क्षमता, महाविकास आघाडीकडे काहीच नाही : प्रकाश आंबेडकर

सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल.
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल.
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?.
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर...
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर....