प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवला निवडणूकपूर्व अंदाज; म्हणाले, भारतीय प्रजासत्ताकाला ‘भयभीत प्रजासत्ताक’…

प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून हा निवडणूकपूर्व अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजातून त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. तर काँग्रेसलाही कानपिचक्या दिल्या आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवला निवडणूकपूर्व अंदाज; म्हणाले, भारतीय प्रजासत्ताकाला 'भयभीत प्रजासत्ताक'...
prakash ambedkar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 12:19 PM

मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अजून वर्ष बाकी आहे. मात्र, त्यापूर्वीच निवडणुकीच्या संभाव्य निकालाचे अंदाज वर्तवले जात आहेत. त्यात भाजप आणि काँग्रेसला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवला जात आहे. संपूर्ण देशाची परिस्थिती आणि राज्यनिहाय निवडणूकपूर्व अंदाज वर्तवले जात आहेत. हे अंदाज आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वेगळाच निवडणूकपूर्व अंदाज वर्तवला आहे. या अंदाजात आकडेवारी नाही. कोणता पक्ष विजयी होणार? कुणाला किती जागा मिळणार? याचा हा अंदाज नाहीये. तर निवडणुकीपूर्व देशात काय होऊ शकतं? देशाची परिस्थिती काय असू शकते? याचा अंदाज आंबेडकर यांनी वर्तवला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून हा निवडणूकपूर्व अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजातून त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. तर काँग्रेसलाही कानपिचक्या दिल्या आहेत. एक प्रकारे त्यांनी भविष्यातील संकटाची माहितीच आपल्या ट्विटमधून दिली आहे. या ट्विटमध्ये आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जस जशा जवळ येतील तसे देशातील दलित आणि आदिवासी यांच्या विरोधातील अत्याचारात तसेच ओबीसी, मुस्लिम आणि महिलांवरील हिंसाचारात लक्षणीय वाढ होणार असल्याचा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

प्ले बूकमधून हिंसाचार निघेल

द्वेष, जातीवाद आणि मृत्यूच्या व्यापारातील सगळ्यात मोठ्या ठेकेदाराच्या ‘प्ले बूक’ मधून लिंचिंग, द्वेषयुक्त भाषणे, सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती पसरवणे, दंगली – हे आणि असे बरेच काही निवडले जाईल. तसेच भाजप-आरएसएसच्या गुंडांच्या मार्फत ते राबवले जाईल, अशी भीतीही प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूकपूर्व अंदाजात व्यक्त केली आहे.

मोहब्बतचे दुकानचे तुणणे

ट्विच्या शेवटी त्यांनी भाजप-RSS ची योजना भारतीय प्रजासत्ताकाला निवडणुकीतल्या फायद्यासाठी ‘भयभीत प्रजासत्ताक’ मध्ये रूपांतरित करण्याची असल्याचा आरोप केला आहे. तसेच यादरम्यान काँग्रेस तटस्थ भूमिका घेईल आणि ‘मोहब्बत की दुकान’चे तुणतुणे वाजवत राहील, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्यांदाच असा अंदाज वर्तवला आहे. इतर निवडणूकपूर्व अंदाजाच्या पलिकडचा हा अंदाज आहे. त्यातून त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. काही गंभीर आरोपही केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडण्याची शक्यता आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.