महिलांना मेकअप बॉक्सचं वाटप, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंवर आचारसंहिताभंगाचा गुन्हा

निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू झाल्याची घोषण केली असतानाही, प्रणिती शिंदे यांचे कार्यकर्ते दुपारी साडेबारा वाजता सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात मेकअप बॉक्स वाटत होते, असा आरोप नरसय्या आडम यांनी केला.

महिलांना मेकअप बॉक्सचं वाटप, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंवर आचारसंहिताभंगाचा गुन्हा
Follow us
| Updated on: Sep 25, 2019 | 11:08 AM

सोलापूर : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि त्यांच्या दोन महिला कार्यकर्त्यांनी मेकअप किट वाटून आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा (Praniti Shinde Break Code of Conduct) सोलापुरात दाखल करण्यात आला आहे. निवडणूक भरारी पथकाचे प्रमुख ईश्वर गिडवीर यांच्या फिर्यादनुसार सोलापुरातील जेल रोड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

विधानसभेसाठी निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर विद्यमान आमदार आणि काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार प्रणिती शिंदे आणि त्यांच्या दोन महिला कार्यकर्त्यांनी व्यंकटेश्वरनगर परिसरामध्ये जाऊन महिला मतदारांना सौंदर्य प्रसाधनांचे बॉक्स वाटल्याचा आरोप (Praniti Shinde Break Code of Conduct) होता.

निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू झाल्याची घोषण केली असतानाही, प्रणिती शिंदे यांचे कार्यकर्ते दुपारी साडेबारा वाजता सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात मेकअप बॉक्स वाटत होते, असा आरोप नरसय्या आडम यांनी केला.

सोबत वाटलेल्या पत्रकांवर विधानसभा सदस्य प्रणिती शिंदे यांचे फोटो असल्याचा आरोप करत नरसय्या आडम यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार दिली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीत तथ्य आढळल्यामुळे पोलिसांनी गुन्हा केला आहे.

प्रणिती शिंदे यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, सोलापूरमध्ये विरोधकांनी घेरलं

तक्रारीनंतर प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया

आडम मास्तर यांच्या आरोपात तथ्य नाही. मी दरवर्षी कृतज्ञता व्यक्त करत असते, मी नेहमीच महिलांना या गोष्टी देत असते. केवळ स्टंटबाजी म्हणून आडम मास्तर यांनी कॅमेऱ्यासमोर आरोप केले आहेत, अशी प्रतिक्रिया प्रणिती शिंदे यांनी आचारसंहिताभंगाची तक्रार झाल्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’कडे व्यक्त केली होती.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघ

सोलापूर शहर मध्य मतदारसंघात सध्या काँग्रेस प्रणिती शिंदे या प्रतिनिधित्व करतात. प्रणिती शिंदे यांनी माकपचे तत्कालीन आमदार आणि कामगार नेते नरसय्या आडम यांचा पराभव करत आपल्या राजकीय जीवनाची ओपनिंग केली होती. त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मोदी लाटेतही प्रणिती शिंदे यांनी एमआयएम आणि शिवसेनच्या उमेदवारांना धूळ चारुन विजय मिळवला होता.

गेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार शेख तौसिफ इस्माईल यांचा जवळपास दहा हजारांच्या मताधिक्याने त्यांनी पराभव केला होता. प्रणिती शिंदे यांना पुन्हा काँग्रेस उमेदवारी देणार का, हे अद्याप निश्चित झालेलं नाही. काही दिवसांपूर्वी पक्षातीलच काही जणांनी मुस्लिम समाजातील उमेदवाराला तिकीट देण्याची मागणी केली होती. त्यातच आता आम आदमी पक्षानेही मुस्लिम उमेदवार जाहीर केल्याने शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

संबंधित बातम्या 

सोलापूरचा आढावा | काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर युतीचं तगडं आव्हान 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.