मुख्यमंत्री कट्टीबट्टीचा डाव खेळत आहेत; प्रसाद लाड यांची घणाघाती टीका

ब्रुक फार्माच्या मालकावरील कारवाई आणि त्यावरून रंगलेल्या राजकारणावरून भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. (prasad lad slams cm uddhav thackeray over bruck pharma)

मुख्यमंत्री कट्टीबट्टीचा डाव खेळत आहेत; प्रसाद लाड यांची घणाघाती टीका
प्रसाद लाड, भाजप आमदार
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 5:24 PM

मुंबई: ब्रुक फार्माच्या मालकावरील कारवाई आणि त्यावरून रंगलेल्या राजकारणावरून भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कट्टीबट्टीचा डाव खेळत आहेत. त्यासाठीच भाजपवर आरोप केले जात आहेत, असा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे. (prasad lad slams cm uddhav thackeray over bruck pharma)

प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केल आहे. राज्यातील जनतेसाठी 50 हजार रेमडिसीवर औषधांचा पुरवठा करण्याचे श्रेय भारतीय जनता पार्टीला मिळू नये यासाठी आघाडी सरकारच्या काही मंत्र्यांनी गलिच्छ राजकारण केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे बालीश राजकारण आता थांबवावे, असे आवाहन लाड यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या या श्रेयवादाच्या खेळामुळे निरपराध जनतेचा जीव जात आहे, याची जाणीव सरकारने ठेवावी, असेही ते म्हणाले.

श्रेय मिळू नये म्हणूनच धमकावले

राज्यातील कोरोना संदर्भातील सोयी सुविधांची बिकट परिस्थिती पाहता भाजपाने सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य म्हणून राज्य सरकारला 50 हजार रेमडिसिवीरऔषधांचा पुरवठा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. भाजपाकडून रेमडिसिवीरचा हा साठा राज्य सरकारकडे सुपूर्त केला जाणार असल्याचे आधीच स्पष्ट केले होते. यासाठी विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व मी दमणला जाऊन ब्रुक फार्माच्या कंपनीला भेट देऊन त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला. त्यासाठी आवश्यक ती परवानगी मिळवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याशीही संपर्क साधुन त्यांना माहिती दिली. अन्न व औषध प्रशासनाने तशी परवनागीही दिली. दमणच्या औषध प्रशासनाकडूनही परवनागी मिळाली होती. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनाही याची माहिती दिली होती. मात्र या उपक्रमाचे श्रेय भाजपाला मिळू नये या संकुचित वृत्तीमुळे महाविकास सरकारकडून शेवटच्या क्षणी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी देऊन चौकशीसाठी बोलवले गेले, असा आरोप लाड यांनी केला.

गृहमंत्र्यांचे वर्तन अनपेक्षित

अलीकडेच राज्य सरकारकडून 11 कंपन्यांना रेमडेसिवीर विक्री करण्याची परवानगी दिली गेली. यामध्ये ब्रुक फार्मा या कंपनीचेसुद्धा नाव आहे. या कंपनीकडे 60 हजार औषधांच्या कुप्यांचा साठा असल्याचा आरोप पोलिसांकडून केला गेला होता. मात्र 48 तास उलटले हा साठा कुठे आहे या प्रश्नावर मात्र हे सरकार निरुत्तर झाले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री शिंगणे किंवा थेट फडणवीस यांच्याकडुन कोणतीही माहिती न घेता, विषय जाणून न घेता थेट गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली आहे. गृहमंत्र्यांचे हे वर्तन पूर्णत: अनपेक्षित होते. सत्ताधाऱ्यांच्या कोणत्याही धमकीला आम्ही घाबरत नाही. जनतेच्या कल्याणासाठी आमच्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी चालतील, असे ते म्हणाले.

राजकारण बाजूला ठेवा

राज्यात रेमडिसीवीर औषधांसाठी रूग्णांची फरफट होत आहे. सरकारने सद्यस्थितीचे भान राखावे, राजकारण बाजुला ठेवावे व जनतेच्या हितासाठी जे योग्य आहे त्यासाठी विरोधकांकडे जर चांगल्या योजना असतील तर त्याची माहिती घेऊन एकत्रितरीत्या काम करावे आणि राज्याला या संकटाला बाहेर काढावे, असं आवाहनही त्यांनी केलं. (prasad lad slams cm uddhav thackeray over bruck pharma)

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

Corona Cases and Lockdown News LIVE : किराणा दुकानांची वेळ सकाळी 7 ते 11 करण्याचा विचार, आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान

‘कोरोनापेक्षाही भयंकर कीड म्हणजे राजकारण’, अभिनेत्री तेजस्विनी पंडित संतापली!

(prasad lad slams cm uddhav thackeray over bruck pharma)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.