‘सकाळी आयसोलेशन, रात्री सेलिब्रेशन’, नानाच्या नाना तऱ्हा; भाजपची पटोलेंवर टीका

आयसोलेशनमध्ये असतानाही जुहू येथील सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर भाजपने टीका केली आहे. (prasad lad slams nana patole over his home isolation)

'सकाळी आयसोलेशन, रात्री सेलिब्रेशन', नानाच्या नाना तऱ्हा; भाजपची पटोलेंवर टीका
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 7:59 AM

मुंबई: आयसोलेशनमध्ये असतानाही जुहू येथील सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर भाजपने टीका केली आहे. सकाळी आयसोलेशन आणि रात्री सेलिब्रेशन. नानाच्या नाना तऱ्हा, असं म्हणंत भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. (prasad lad slams nana patole over his home isolation)

नाना पटोले यांनी त्यांच्या कुटुंबातील एकाला कोरोनाची लागण झाल्याने काही दिवस आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यानंतरही काल शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जुहू येथील आयोजित कार्यक्रमात भाग घेतला होता. नाना पटोले यांनी स्वत: ट्विट करून त्यांचा कार्यक्रमातील फोटोही शेअर केला होता. त्यावरून भाजप नेते प्रसाद लाड यांनी नाना पटोले यांच्यावर टीका करणारं ट्विट केलं आहे.

लाड काय म्हणाले?

नानाच्या नाना तऱ्हा!! ‘सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन! हाच आहे काँग्रेसचा तमाशा… स्वतःचे कार्यक्रम जोशात साजरे करायचे आणि असेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरे करणाऱ्यांना १४४ कलम लावून अटक करायचं, अशी टीका करतानाच नानाजी मांजरा सारखं वागताय, डोळे मिटून सगळे नियम मोडताय!, असा टोलाही लाड यांनी लगावला आहे.

मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढला

राज्यात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढलं आहे. मुंबईत नव्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये इमारतींना सील करण्यापासून अनेक गाईडलाईन्स जारी करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचा वाढता आकडा पाहता या गाईडलाईन्स महत्त्वाच्या आहेत. अन्यथा पु्न्हा गेलेले दिवस पुन्हा अनुभवायची नामुष्की मुंबईकरांवर ओढवेल. त्यामुळे या गाईडलाईन्स काटेकोरपणे पाळण्याचं आवाहन महापालिका आयुक्तांकडून करण्यात आलं आहे. (prasad lad slams nana patole over his home isolation)

महापालिकेचे कडक निर्बंध

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कडक निर्बंध जारी केले आहेत. कुठल्याही निवासी इमारतीत कोरोनाचे पाच पेक्षा जास्त सक्रीय रुग्ण आढळल्यास ती इमारत सील करण्यात येईल, विलगीकरणाचे नियम, तसेच लग्न आणि सार्वजनिक कार्यक्रमात नियम न पाळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल, ब्राझील येथून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना सात दिवसांकरिता संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्यात येईल, घरी विलगीकरणात राहणाऱ्या व्यक्तींच्या हातावर शिक्का लावण्यात येईल, मास्क न लावता प्रवास करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याकरिता 300 मार्शलची नेमणूक करण्यात येणार आहे, मास्कचा योग्यरित्या वापर न करणाऱ्या आणि रस्त्यांवर थुंकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याकरिता मार्शल्सची संख्या दुपचीने वाढवून 48 हजार एवढी करण्यात येणार आहे, विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आणि दंड आकारण्याचेल अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत आणि लग्न सोहळ्यांचे आयोजन होणारे सभागृह, मंगल कार्यालये येथे नियमितपणे तपासणी केली जाईल. कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले असल्यास दंडात्मक कारवाई करुन आयोजक आणि संबंधित व्यवस्थापनांवर गुन्हे दाखल केले जातील, असं पालिकेने म्हटलं आहे. (prasad lad slams nana patole over his home isolation)

संबंधित बातम्या:

यवतमाळवर पुन्हा कोरोनाचं संकट, जिल्हाधिकारी रस्त्यावर, नव्याने निर्बंध लागू!

VIDEO | विनामास्क-विनाहेल्मेट बाईक राईड, विवेक ओबेरॉयला ‘मस्ती’ नडली, मुंबई पोलिसांची कारवाई

पुण्यात मास्क न घातल्यास 1 हजार रुपयांचा दंड, कोरोनाची नवी नियमावली जाहीर

(prasad lad slams nana patole over his home isolation)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.