Prashant Kishore : मोदी तिसऱ्यांदा सत्तेत येताच देशात एक मोठा बदल होईल, प्रशांत किशोर यांचा दावा
Prashant Kishore : प्रशांत किशोर यांनी एक मोठा दावा केला आहेय निवडणुकीआधीच भाजपाने 400 पारचा नारा दिला होता. त्यावर आता चर्चा सुरु आहेत. भाजपाला 400 पार शक्य होणार नाही. त्यांना तेवढ्या जागा मिळणार नाहीत, असं प्रशांत किशोर यांच म्हणण आहे.
प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या राजकीय विश्लेषणाकडे सत्ताधाऱ्यांचे समर्थक आणि विरोधक या दोघांचही लक्ष असतं. कारण प्रशांत किशोर यांच्याकडे देशातील विविध पक्षांसोबत काम करण्याचा, जनमानसाची नस ओळखण्याचा अनुभव आहे. प्रशांत किशोर यांनी सध्या देशात सुरु असलेल्या लोकसभा निवडणूक 2024 बद्दल काही अंदाज वर्तवले आहेत. त्यावरुन सोशल मीडियावर भाजपा समर्थक आणि विरोधकांमध्ये शाब्दीक लढाई सुरु आहे. दोन गट पडले आहेत. लोकसभा निवडणुकीआधीच भाजपाने 400 पारचा नारा दिला होता. त्यावर आता चर्चा सुरु आहेत. भाजपाला 400 पार शक्य होणार नाही. त्यांना तेवढ्या जागा मिळणार नाहीत, असं प्रशांत किशोर यांच म्हणण आहे. प्रशांत किशोर यांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदींची 400 पारची घोषणा ही कार्यकर्त्यांना उत्साह वाढवण्यासाठी आहे.
‘भाजपाला स्वबळावर 370 जागा मिळणं अशक्य आहे, पण त्यांना जवळपास 300 जागा मिळतील’ असा प्रशांत किशोर यांचा अंदाज आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 303 जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्यांच्या जागा 303 च्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त वाढू शकतात, असं प्रशांत किशोर यांचं म्हणण आहे. प्रशांत किशोर हे जन सुराज पार्टीचे प्रमुख आहेत. त्यांनी एका खासगी टीव्ही चॅनलला मुलाखत दिली. देशात मोदी सरकार आल्यानंतर काय बदल होणार, त्या बद्दलही प्रशांत किशोर बोलले आहेत.
मोदी आल्यास काय मोठा बदल होईल?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात पेट्रोलियम उत्पादनांना वस्तू आणि सेवा कराच्या (GST) कक्षेत आणलं जाईल. राज्याच्या आर्थिक स्वायत्ततेवर लगाम घातला जाईल असा प्रशांत किशोर यांचा दावा आहे. दैनिक जागरणने हे वृत्त दिलय. राज्यांकडे सध्या महसूलाचे तीन प्रमुख स्त्रोत आहेत. पेट्रोलियम, दारु आणि जमीन. पेट्रोलियम पदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणल्यास मला आश्चर्य वाटणार नाही असं पीके म्हणाले. सध्या पेट्रोल, डीजेल, एटीएफ आणि नॅच्युरल गॅस जीएसटीच्या कक्षेच्या बाहेर आहेत.
मतदानाने त्यांना सत्तेतून बाहेर घालवू शकतात
लोकांमध्ये विद्यमान सरकार आणि त्यांच्या नेत्यांविरोधात मनात राग असेल, आणि समोर पर्याय नसला, तरी लोक मतदानाने त्यांना सत्तेतून बाहेर घालवू शकतात. पण मला मोदी सरकारविरोधात लोकांमध्ये तो आक्रोश दिसत नाहीय असं प्रशांत किशोर म्हणाले.