Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी केलेले आरोप दिशाभूल करणारे -प्रताप पाटील चिखलीकर
अशोक चव्हाण यांनी केलेले आरोप दिशाभूल करणारे- प्रताप पाटील चिखलीकर
नांदेड : अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी नांदेड मध्ये पत्रकार परिषद घेत अनेक आरोप केले, ते दिशाभूल करणारे आहेत. फडणवीस सरकार गेलं तेव्हा सर्व कामांना महाविकास आघाडीकडून स्थगिती मिळाली होती. अशोक चव्हाण यांनी एक काम केलं अणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात अनेक प्रोजेक्ट राबवले. मागच्या सरकारने काहीही भुमिका घेतली नाही. अशोक चव्हाण यांनी जनतेला उत्तरं दिलं पाहिजे. ते सांगतात आम्ही केलं पण इतकी वर्ष लेंडी प्रकल्प का झाला नव्हता, असं म्हणत खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) यांनी अशोक चव्हाण यांच्या आरोपांचं खंडण केलं आहे. शिवाय अशोक चव्हाण यांच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचंही चिखलीकर म्हणाले आहेत.
“मोदी सरकार हे विकासाच सरकार आहे. अशोक चव्हाण यांनी एक प्लांट उभा केला पण नरेंद्र मोदी यांनी 2 प्लांट उभे केले. चव्हाण यांच्यासारखा एका क्रमांकाचा माणूस आता सत्तेसाठी कोणत्या पदाला गेला. महाराष्ट्रातले सर्वात बकाल शहर नांदेड शहर आहे. अशोक चव्हाण यांनी काहीही कामे केली नाहीत. सरकार जाणार असताना अनेक कामे नियम बाह्य केली गेली. नांदेडचा आम्ही सर्वे केला निधी मिळवून देण्यासाठी चव्हाण यांनी काहीही प्रयत्न केले नाहीत”, असंही चिखलीकर म्हणाले आहेत.
“लेंडी प्रकल्प रखडला, का रखडला अशोक चव्हाण यानी यावर उत्तर द्यायला हवे. प्रत्येक निवडणुकीत या प्रकल्पाचा उल्लेख चव्हाण करतात. आज या प्रकल्पाची आताची किंमत 600 कोटींवर केली आहे.अशोक चव्हाण हे वरच्या स्थानवरून खाली आले. नांदेडमध्ये DPDC ची बैठक घेऊन कामे मंजूर केली. नांदेड भकास केलं. नांदेडमध्ये रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते हे कळत नाही”, असं म्हणत चिखली कर यांनी अशोक चव्हाण यांच्या कामावर टीका केली आहे.
“अशोक चव्हाण याचा अभिनंदन करेल. शहराच्या नामांतरला पाठिंबा दिला त्यामुळे मनापासून आभार. अनेक वर्ष सत्तेत राहून चव्हाण यानी का प्रकल्प पूर्ण केले नाही.५० वर्ष त्यांच्या घरात सत्ता होती का नाही नांदेडमध्ये एकही नॅशनल हायव्हे नाही. ५० वर्षात एकही हायवे करता येत नाही. त्या नांदेडमध्ये गडकरींनी रस्ते बांधायला सुरूवात केली. लोकांना उपदेश करण्यापेक्षा आपण काय केलं यावर आत्मचितन करावं. सरकार पडत असल्याचे माहित असतानाही डिपीडिसीची बैठक लावली.निवडणुक डोळ्यासमोर ठेवून काम आम्ही करत नाही. नांदेडमध्ये यांनी काम कमी आणि खड्डे जास्त खोदले मात्र चव्हाण याचं एकचं कौतुक करीन कि औरंगाबादचं संभाजी नगर नामांतरण केलं उस्मानाबादचं धाराशीव हे नामांतरण केलं, याबाबत चव्हाणांचं मी कौतुक करतो”, असंही चिखलीकर म्हणालेत.