सोमय्यांचा गंभीर आरोप, सरनाईकांचा शंभर कोटींचा दावा, कशी असेल पुढची हवा?
किरीट सोमय्या यांच्या विरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितलं. (Pratap sarnaik Kirit Somaiya)
ठाणे : ईडीच्या चौकशीची डोक्यावर टांगती तलवार असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांची शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली आहे. किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून त्यांच्या विरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितलं. “विहंग गार्डन्स ही इमारत कोणत्याही प्रकारे अनधिकृत नाही. ती इमारत संपूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन उभारण्यात आली आहे. त्यामुळे माझी खोटी बदनामी केल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांच्याविरोधात मी कोर्टात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे,” असे प्रताप सरनाईक म्हणाले. तसेच, त्यांनी सोमय्या यांचे आरोप म्हणजे खोदा पहाड निकला चुहा असल्याचे म्हणत, सर्व आरोप फेटाळले आहेत. (Pratap sarnaik will file defamation case against Kirit Somaiya)
भाजपकडून अडचणीत आणण्याचे काम
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच, सोमय्या यांच्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. त्याबरोबरच, भाजपकडून अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. “कधी पाकिस्तानी कार्ड, तर कधी इतर लोकांचे संबंध माझ्याशी जोडायचे, तर कधी तानाजी मालुसरे यांची तुलना करून मला गोत्यात टाकण्याचे काम भाजपकडून होत आहे,” असे सरनाईक म्हणाले. तसेच, मी शेवटपर्यंत ED च्या चौकशीला सामोरे जाईल असेही सरनाईक यांनी सांगितले. (Pratap sarnaik will file defamation case against Kirit Somaiya)
किरीट सोमय्या यांचे आरोप काय?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी बुधवारी (16 डिसेंबर) ठाणे येथे पत्रकार परिषद घेऊन अनधिकृतपणे इमारत बांधल्याचा आरोप केला. सरनाईक यांच्या विहंग गार्डन या इमारतीला पालिकेचा परवाना नाही. ही इमारत अनधिकृत आहे. त्यामुळे महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले होते.
दरम्यान, सोमय्या यांच्या याच आरोपांची सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली आहे. ते सोमय्या यांच्याविरोधात 100 कोटींचा दावा ठोकण्याच्या तयारीत आहे.
पिंपरीत क्रूरतेचा कळस, कुत्र्याला इमारतीवरुन फेकून ठार मारलंhttps://t.co/Z5TtQqxUSp#Pune
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 16, 2020
संबंधित बातम्या :
प्रताप सरनाईकांवर किरीट सोमय्यांचा नवा आरोप! कारवाईची मागणी
Reduce Corona Test Rate | कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये सहाव्यांदा कपात, पाहा नवीन चाचणीचे दर…
(Pratap sarnaik will file defamation case against Kirit Somaiya)