पवारांनी सुनील शेळकेंचं मताधिक्य सांगितलं, तर दरेकरांनी नातवाची लीड दाखवली! ‘त्या’ घटनेनं पार्थ पवार पिछाडीवर?

शरद पवार यांनी आज फडणवीसांना उत्तर देताना मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला तब्बल 90 हजाराचं मताधिक्य मिळाल्याचं सांगितलं. तर आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लोकसभा  निवडणुकीत शरद पवारांचे नातू पार्थ पवार पिछाडीवर होते याची आठवण करुन दिलीय.

पवारांनी सुनील शेळकेंचं मताधिक्य सांगितलं, तर दरेकरांनी नातवाची लीड दाखवली! 'त्या' घटनेनं पार्थ पवार पिछाडीवर?
शरद पवार आणि प्रवीण दरेकर.
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 6:06 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखीमपूर हिंसाचाराची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना मावळ गोळीबाराची आठवण करुन दिली. त्यावरुन आता पुन्हा एकदा जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. शरद पवार यांनी आज फडणवीसांना उत्तर देताना मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला तब्बल 90 हजाराचं मताधिक्य मिळाल्याचं सांगितलं. तर आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लोकसभा  निवडणुकीत शरद पवारांचे नातू पार्थ पवार पिछाडीवर होते याची आठवण करुन दिलीय. (Praveen Darekar’s reply to Sharad Pawar’s criticism of Devendra Fadnavis and Maval Firing Case )

पवारांनी सुनील शेळकेंचं मताधिक्य सांगितलं

मावळचा गोळीबार पोलिसांनी केला होता. शेतकऱ्यांच्या मृत्यूला राजकीय पक्षाचे नेते जबाबदार नव्हते असं पवारांनी सांगितलं. त्याचबरोबर मावळमध्ये आता चित्र बदललं आहे. लोकांना वस्तुस्थिती कळाली आहे. माझ्या जिल्ह्यातील तालुका असल्यामुळे सांगत, मावळ तालुक्यात सातत्यानं जनसंघ, नंतर भाजप होतं. रामभाऊ म्हाळगी हे नेहमी मावळचे प्रतिनिधी होते, असंही पवार म्हणाले. इतकंच नाही तर मावळमध्ये लोकांना भडकावण्याचं काम कुणी केलं हे लक्षात आल्यानंतर त्या मावळमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. सुनील शेळके हे 90 हजाराच्या फरकानं निवडून आले आहेत. मावळमध्ये संताप असता तर एवढ्या फरकानं राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला नसता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मावळची स्थिती समजून घेतली तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा टोलाही पवारांनी लगावला आहे.

दरेकरांनी पार्थ पवारांची पिछाडी दाखवली

दरम्यान पवारांच्या या टीकेला आता प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर दिलंय. पार्थ पवार लोकसभा निवडणुकीत उभे असताना मावळमधून पिछाडीवर होते, अशी आठवण दरेकरांनी पवारांना करुन दिली आहे. तसंच मावळात भाजपला जनाधार किती हे परत एकदा बघा, असं आव्हानही दरेकरांनी दिलंय. केंद्रीय तपास यंत्रणांवर टीका करणं योग्य नाही. जे काय सुरु हे आहे ते न्यायालयाच्या चौकटीत सुरु आहे. केंद्रीय यंत्रणा चांगला तपास करत असतील तर त्यांची पाठ थोपटायला हवी. पण याउलट यंत्रणांना बळ मिळण्याऐवजी ड्रग्स तक्सरांना बळ दिलं जात आहे.

‘जनतेचा आजही फडणवीसांवर जास्त विश्वास’

शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत्या वक्तव्यावरही टीका केली होती. पवारांच्या या टीकेला उत्तर देताना प्रवीण दरेकर यांनी पवार आणि महाविकास आघाडी सरकारला टोला लगावलाय. ‘महाराष्ट्रातील शेतकरी फडणवीस सरकारच्या काळात झालेली मदत आजही विसरलेला नाही. विरोधी पक्षनेते असूनही जनतेचा त्यांच्यावर जास्त विश्वास आहे’, असं दरेकर म्हणाले.

इतर बातम्या :

पवार म्हणाले मी मुख्यमंत्री होतो ते लक्षात नाही, आता फडणवीस म्हणाले, मी सलग 5 वर्षे होतो ना? पवारांच्या दुखऱ्या नसीवर बोट?

‘भाजपमध्ये आल्यापासून शांत झोप लागते, चौकशीही नाही’, हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्यानं खळबळ; आता विरोधकांना रान मोकळं!

Praveen Darekar’s reply to Sharad Pawar’s criticism of Devendra Fadnavis and Maval Firing Case

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.