कोरोनाग्रस्तांसोबत रोहित पवारांचा डान्स, दरेकर म्हणतात पवारांचा नातू म्हणून दुसरा न्याय का?

रोहित पवार अहमदनगरमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या चेहऱ्यावरील ताण दूर करण्यासाठी त्यांच्यासोबत झिंगाट गाण्यावर थिरकताना पाहायला मिळालं (Pravin Darekar Rohit Pawar Dance)

कोरोनाग्रस्तांसोबत रोहित पवारांचा डान्स, दरेकर म्हणतात पवारांचा नातू म्हणून दुसरा न्याय का?
रोहित पवारांच्या डान्सवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 12:40 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कोरोना रुग्णांसोबत नुकताच झिंगाट गाण्यावर डान्स (Zingaat Song Dance) केला. एकीकडे या डान्सचं कौतुक होत असतानाच विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. “पीपीई किट न घालता रोहित पवारांनी डान्स केला. शरद पवार यांचे नातू आहेत, म्हणून रोहित पवारांना दुसरा न्याय का?” असा सवाल विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी विचारला आहे. (Pravin Darekar asks if Rohit Pawar Zingaat Song Dance gets concession because he is Sharad Pawar’s Grand Son)

“रोहित पवार सुपर स्प्रेडर ठरु शकतात”

“रोहित पवार यांनी एका कोव्हिड सेंटरवर जाऊन कोव्हिड प्रोटोकॉलचा भंग केला, तो निषेधार्ह आहे. कोणतंही पीपीई किट न घालता ते गेले, त्यामुळे ते सुपर स्प्रेडर ठरु शकतात. सर्व सामन्य नागरिकांना एक न्याय आणि रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत म्हणून त्यांना दुसरा न्याय का, असा प्रश्न निर्माण होतो. कुणीही लोक प्रतिनिधी असो, त्यांनी गांभीर्याने या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे” असं प्रवीण दरेकर म्हणाले.

नेमकं काय घडलं?

कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोव्हिड केअर सेंटरला कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला.

रुग्णांचे मनोबल वाढावे तसंच त्यांना मनोरंजन म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रोहित पवार रुग्णांच्या चेहऱ्यावरील ताण दूर करण्यासाठी त्यांच्यासोबत झिंगाट गाण्यावर थिरकताना पाहायला मिळालं. यावेळी कोरोना रुग्णही भारावल्याचं चित्र दिसलं.

पाहा व्हिडीओ :

कोरोना रुग्णांची सातत्याने विचारपूस

रोहित पवार हे सातत्याने आपल्या मतदारसंघातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना पाहायला मिळतात. वेळोवेळी विविध रुग्णालये, तसंच कोविड सेंटरला भेटी देऊन ते रुग्णांशी चर्चा करताना पाहायला मिळतात. तसंच रुग्णांवर होणाऱ्या उपचारांची माहितीही ते घेत असतात. रविवारी रोहित पवार यांनी बारामतीमधील कोविड सेंटरला भेट देत स्थितीचा आढावा घेतला.

संबंधित बातम्या :

Video : कोरोना रुग्णांसोबत रोहित पवारांचा ‘झिंगाट’ डान्स! कोरोना रुग्णही भारावले

राज्यसरकार नुकसानग्रस्तांना मदत करेलच, पण फडणवीसांनीही केंद्राला पत्र लिहावं : रोहित पवार

(Pravin Darekar asks if Rohit Pawar Zingaat Song Dance gets concession because he is Sharad Pawar’s Grand Son)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.