संजय राऊत यांचा मेजर ध्यानचंद यांच्या नावाला विरोध आहे का?; प्रविण दरेकर यांचा सवाल

शिवसेना नेते संजय राऊत यांनी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आल्याने त्यावरून भाजप सरकारवर टीका केली होती. राऊत यांच्या या टीकेचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी समाचार घेतला आहे. (pravin darekar)

संजय राऊत यांचा मेजर ध्यानचंद यांच्या नावाला विरोध आहे का?; प्रविण दरेकर यांचा सवाल
pravin-darekar
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 12:29 PM

माणगाव: शिवसेना नेते संजय राऊत यांनी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आल्याने त्यावरून भाजप सरकारवर टीका केली होती. राऊत यांच्या या टीकेचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी समाचार घेतला आहे. राऊत यांचा मेजर ध्यानचंद यांच्या नावाला विरोध आहे का?, असा सवाल प्रविण दरेकर यांनी केला आहे. (pravin darekar attacks sanjay raut over khel ratna award issue)

प्रविण दरेकर माणगावला आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला. पुरस्काराचं नाव बदललं म्हणून राऊत टीका करत आहेत. पण त्यांनी थोडं आत्मपरीक्षण करावं. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर त्यांनी किती योजनांची नावं बदलली ते पाहावं, असा चिमटा काढतानाच राऊत यांचा मेजर ध्यानचंद यांच्या नावाला विरोध आहे का?, असा सवाल दरेकर यांनी केला.

व्यापाऱ्यांची बैठक घेणार

सरकारने मदत तर जाहीर केलेली आहे. पण ती खरंच पूरग्रस्तांना पोहोचली आहे की नाही त्याची पाहणी मी आज करणार आहे. त्यासाठीच माणगावला आलो आहे. रायगड जिल्ह्यातील माझा हा तिसऱ्यांदा दौरा आहे. व्यापाऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यासंदर्भात आज मी महाडच्या व्यापारी संघटनांसोबत बैठक सुद्धा घेणार आहे, असं दरेकर म्हणाले.

मेट्रोचं काम आमचंच

यावेळी त्यांनी पुणे मेट्रो प्रकल्पावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. पुणे मेट्रोची सगळी कामं ही भाजपच्या काळात झालेली आहेत. परंतु फक्त सत्ता असल्यामुळे उद्घाटन करण्याचा मान या महाविकास आघाडी सरकारला मिळाला आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच गल्लीतल्या नेत्यानी पंतप्रधानांवर टीका करू नये, असा टोलाही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना लगावला.

फडणवीसांकडून पाहणी

दरम्यान, पुणे मेट्रोच्या कामावरुन आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल रन पार पडली होती. त्यावेळी अजित पवार यांनी पुणे मेट्रोला हिरवा कंदिल दाखवला होता. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करणार आहेत. देवेंद्र फडणवीस आज दुपारी 3 वाजता शिवाजीनगर इथल्या मुख्य टर्मिनसवरील मेट्रोच्या कामाची पाहणी करणार आहेत. (pravin darekar attacks sanjay raut over khel ratna award issue)

संबंधित बातम्या:

राजीव गांधी मोठे नेते, नेहरु गांधींचं नाव बदलण्याचं या सरकारचं धोरण, राऊतांचा हल्लाबोल

स्वत:ला गाव राखता आलं नाही अन् राऊतांना कसलं आव्हान देताय; मुश्रीफांचा चंद्रकांतदादांना खोचक टोला

पुणे मेट्रोवरुन भाजप-राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई? फडणवीस पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करणार

(pravin darekar attacks sanjay raut over khel ratna award issue)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.