सरकारने हुकुमशाही करत विधीमंडळाच्या मार्शलमार्फत आमचे माईक, स्पीकर काढून घेतले : प्रविण दरेकर

विधानभवनाच्या सुरक्षा रक्षक अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देणे ही सरकाराची मनमानी आहे. हा एका प्रकारे लोकशाहीचा खून आहे, असं मत प्रविण दरेकर यांनी व्यक्त केलं.

सरकारने हुकुमशाही करत विधीमंडळाच्या मार्शलमार्फत आमचे माईक, स्पीकर काढून घेतले : प्रविण दरेकर
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 4:47 PM

मुंबई : लोकशाही प्रक्रियेनुसार विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानभवनाच्या परिसरात अभिरुप विधानसभा भरविली. त्यामध्ये विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आपण कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नाही, तरीही सरकारने हुकुमशाही करीत विधीमंडळाच्या मार्शलमार्फत आमचे माईक, स्पीकर काढून घेतल्याचा दावा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलाय. तसेच विधानभवनाच्या सुरक्षा रक्षक अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देणे ही सरकाराची मनमानी आहे. हा एका प्रकारे लोकशाहीचा खून आहे, या शब्दात प्रविण दरेकर यांनी सरकारचा धिक्कार नोंदवला (Pravin Darekar criticize Thackeray government for action against BJP MLA in assembly).

विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सोमवारी (5 जुलै) भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलं. त्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजप व मित्र पक्षांच्या आमदारांनी थेट विधानभवनाच्या पायऱ्यांजवळील प्रवेशद्वावर अभिरुप विधानसभा आयोजित करत भाजपच्या आमदारांचे निलंबन करण्याच्या निर्णयाचा निषेध नोंदविला.

“फक्त विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार”

हा विषय विधानपरिषेदत उपस्थित झाल्यानंतर यासंदर्भात बोलताना दरेकर म्हणाले, “माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर बसून अभिरुपी विधानसभा भरवावी लागते. तरीही या अभिरुपी विधानसभेच्या कामकाजावर सुरक्षा रक्षकांमार्फत कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतात. हे दुर्दैवी आहे. फक्त विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार आहे.”

“माइक आणि स्पीकर काढून घेऊन विरोधकांचा आवाज दाबता येणार नाही”

“भाजपाच्या 12 सदस्यांच्या निलंबन प्रकरणाच्या चौकशीमध्ये सत्य नक्कीच बाहेर येईल. माइक आणि स्पीकर काढून घेऊन विरोधकांचा आवाज दाबता येणार नाही. विरोधी पक्षांचे सदस्य विधानसभा कामकाजात सहभागी होत नसतील तर कामकाज स्थगित करता येते. विधिमंडळाच्या कामकाजामध्ये विरोधी पक्ष उपस्थित नसेल तर त्या कामकाजाला महत्व नसते. कारण लोकशाहीमध्ये, संविधानामध्ये विरोधी पक्षालाही तितकेच महत्व आहे,” अशी टीका दरेकर यांनी केली.

हेही वाचा :

तरूणांकडे आज रोजगार नाही, पण दारूची बाटली सहज उपलब्ध करून दिली जातेय : प्रविण दरेकर

12 आमदारांचं निलंबन करून महाविकास आघाडीने लोकशाहीचा गळा घोटला; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना तातडीने 50 लाखांची मदत द्या; प्रविण दरेकरांचीही मागणी

व्हिडीओ पाहा :

Pravin Darekar criticize Thackeray government for action against BJP MLA in assembly

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.