प्रवीण कलमे हा जितेंद्र आव्हाडांचा सचिन वाझे, किरीट सोमय्यांचा मोठा आरोप

प्रवीण कलमे हा जितेंद्र आव्हाडांचा सचिन वाझे आहे. मुख्यमंत्र्यांनी आव्हाडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी", अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली.

प्रवीण कलमे हा जितेंद्र आव्हाडांचा सचिन वाझे, किरीट सोमय्यांचा मोठा आरोप
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 3:05 PM

मुंबई : “ठाकरे सरकारचे 12 आमदार चौकशीचा फेऱ्यात आहेत. आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि प्रवीण कलमे (Praveen Kalme ) ही जोडी पुढे आली आहे. प्रवीण कलमे हा जितेंद्र आव्हाडांचा सचिन वाझे आहे. मुख्यमंत्र्यांनी आव्हाडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी”, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांनी आव्हाडांवर हल्लाबोल केला.

सोमय्या म्हणाले, “गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज फिरत आहे. एखाद्याच्या मागे ईडी लागली की त्याचा काळ बदलतो. ठाकरे सरकारचे 12 आमदार चौकशीचा फेऱ्यात आहेत. Ed-कॅग अधिकाऱ्यांनी एका आमदारांची 2 तास चौकशी केली होती. ईडीने जप्त केलेले SRA फ्लॅट डेव्हलप करायला दिले आहेत. आता जितेंद्र आव्हाड आणि प्रवीण कलमे ही जोडी पुढे आली आहे. जितेंद्र आव्हाड यांना माझा प्रश्न आहे. कोण हा कलमे त्याचा तुमचा संबंध काय हे सांगा”

आव्हाड- कलमे नवी वसुलीची जोडी आहे का?

जुलै 2020 मध्ये 100 टक्के लॉकडाऊन होता. 6 जुलै 2020 या दिवशी 81 आरटीआय टाकले जातात. आणि त्याच्यावर जितेंद्र आव्हाड हे कारवाई करण्याचे आदेश देतात. आव्हाड यांना करोना झाला होता. ते बरे झाल्यावर त्यांनी प्रथम प्रवीण कलमे यांच्या अर्जावर सही केली. आव्हाड आणि कलमे ही नवीन वसुलीची जोडी आहे का? असा सवाल किरीट सोमय्यांनी केला

प्रवीण कलमे हे आव्हाडांचे सचिन वाझे

SRA चे ceo यांनी कर्मचारी नाहीत , असं सांगितल्यावर आव्हाड भडकले. 62 SRA प्रकल्पाची पाहणी कलमे याने सुरू केली. प्रवीण कलमे हा जितेंद्र आव्हाडांचा सचिन वाझे आहे. जितेंद्र आव्हाड कुठे पैसे पार्क करतात हे आम्हाला माहीत आहे. या वसुलीच्या जोड्यांना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला. त्या काळात 100 टक्के लॉकडाऊन होता. चार महिन्याचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. आणि 106 व्या दिवशी जितेंद्र आव्हाड यांनी कलमे यांना माहिती देण्याचे आदेश दिलेत. Sra बाबतही काही कलकत्ता कंपन्याच्या मार्फत गुंतवणूक करण्यात आली आहे, असा आरोप सोमय्यांनी केला.

आव्हाडांनीच कलमे यांनाच आरटीआय अर्ज करायला सांगितला आहे. आव्हाड यांची मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी करावी , अशी माझी मागणी आहे. आपल्याकडे किती जोड्या आहेत हा माझा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे.

किरीट सोमय्या यांचं जुनं ट्विट 

संबंधित बातम्या  

गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, 100 रुपये प्रती स्क्वेअर फूटचा भाव, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

आधी राणेंच्या बेहिशेबी मालमत्तेची तक्रार, आता राणेंकडेच सोमय्यांकडून सेनेच्या बड्या नेत्यांवर कारवाईची मागणी

Rohit Pawar यांनी गडबड करुन कन्नड सहकारी साखर कारखाना विकत घेतला, Kirit Somaiya यांचा आरोप

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.