Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

24 तासांत कागदपत्र जनतेसमोर मांडा; PFI वर ED आणि NAI ने केलेल्या कारवाईनंतर प्रकाश आंबेडकरांचे भाजपला चॅलेंज

देशभरातील एटीएस आणि एनआयच्या कारवायांवर प्रकाश आंबेडकरांनी टीका केलेली आहे. या कारवाईतील कागदपत्र जनतेसमोर मांडवीत अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

24 तासांत कागदपत्र जनतेसमोर मांडा; PFI वर ED आणि NAI ने केलेल्या कारवाईनंतर प्रकाश आंबेडकरांचे भाजपला चॅलेंज
Image Credit source:
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 9:36 PM

पुणे : पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या विरोधात मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक करत धडक कारवाई केली आहे. देशभरातील विविध राज्यांत पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या कार्यालयांवर ईडी आणि एनआयएने धाडी टाकल्या. या कारवाईत 106 संशयीतां ताब्यात घेतले आहे. आता या कारवाईवरुन राजकारण पेटण्याची शक्यता आहे. या कारवाईचे कागदपत्र 24 तासांत जनतेसमोर मांडा असं चॅलेंजच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी भाजपला दिले आहे.

देशभरातील एटीएस आणि एनआयच्या कारवायांवर प्रकाश आंबेडकरांनी टीका केलेली आहे. या कारवाईतील कागदपत्र जनतेसमोर मांडवीत अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

कागदपत्र सादर केली नाही तर जनता हेच समजेल की भाजपचा मुस्लिम विरोधी अजेंडा सुरू आहे अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

गुरुवारी पहाटेपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात आणि देशभरात विविध ठिकाणी मुस्लिम संघटनांवर धाडी टाकल्या. तपास यंत्रणांचा धाडी टाकण्याचा त्यांचा अधिकार आम्ही मान्य करतो असे आंबेडकर म्हणाले.

या धाडी का टाकल्या आहेत? यांच्याविरोधात काय पुरावे होते?आपण जी कागदपत्र गोळा केलेली आहेत, त्यात किती निधी मिळाला? देशविरोधी कारवायांचे किती कागदपत्रे मिळाली? हे या यंत्रणांनी येत्या 24 तासात जनतेसमोर मांडावं असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना केले आहे.

तपास यंत्रणांनी 24 तासात कारवाईचा लेखाजोखा मांडता आलं नाही, तर सामान्य माणूस हेच लक्षात घेईल की, भाजपचा जो मुस्लिम विरोधी अजेंडा आहे, तो पुढे करण्याकरिताच या धाडी टाकण्यात आल्या आहेत असे आंबेडकर म्हणाले.

वंचित बहुजन आघाडी या धाडींचा निषेध करते असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. राजकीय पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी कारवाईचा लेखाजोखा मांडण्याची मागणी करत आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.