Presidential Election 2022 Results : द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा?, काऊंटडाऊन सुरू; देशाला आज मिळणार नवा राष्ट्रपती!

Presidential Election 2022 Results : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी म्हणजे 18 जून रोजी मतदान झालं. यावेळी 98.90 मतदान झालं. 727 खासदार आणि 9 आमदारांसह एकूण 736 लोकप्रतिनिधींना संसद भवनात मतदानाला परवानगी देण्यात आली होती.

Presidential Election 2022 Results  : द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा?, काऊंटडाऊन सुरू; देशाला आज मिळणार नवा राष्ट्रपती!
द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा?, काऊंटडाऊन सुरू; देशाला आज मिळणार नवा राष्ट्रपती!Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 6:30 AM

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाची निवडणूक (president election) पार पडल्यानंतर आज मतमोजणी सुरू होणार आहे. काही वेळातच या मतमोजणीला सुरूवात होणार असून देशाचा 15 राष्ट्रपती कोण असणार हे स्पष्ट होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (NDA) द्रौपदी मुर्मू आणि संयुक्त पुरोगामी आघाडीकडून (UPA) यशवंत सिन्हा निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत अटीतटीची लढत होणार असल्याने आजच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. येत्या 24 जुलै रोजी विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे ही निवडणूक होत आहे. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील आहेत. त्या निवडून आल्यास देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळेल. तसेच पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होण्याचा मानही त्यांना मिळेल. तर, यशवंत सिन्हा हे पूर्वी भाजपमध्ये होते. आता तृणमूल काँग्रेसमध्ये आहेत. ते माजी केंद्रीय अर्थमंत्री आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते होते.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी म्हणजे 18 जून रोजी मतदान झालं. यावेळी 98.90 मतदान झालं. 727 खासदार आणि 9 आमदारांसह एकूण 736 लोकप्रतिनिधींना संसद भवनात मतदानाला परवानगी देण्यात आली होती. त्यापैकी 719 खासदार आणि 9 आमदारांसहीत एकूण 728 लोकप्रतिनिधींनी मतदानात भाग घेतला होता. तसेच जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निलंबित अवस्थेत असल्यामुळे हे राज्य वगळता देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेतील सदस्यांनी मतदानात भाग घेतला.

हे सुद्धा वाचा

क्रॉस व्होटिंग जोरात

यावेळी काही ठिकाणी क्रॉस व्होटिंगही झाली. गुजरातमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पार्टीचे आमदार कंधाल एस. जडेजा यांनी भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केलं. काँग्रेसच्या आमदारांनी मुर्मू यांना मतदान केलं. त्यानंतर आम्ही अंतरात्म्याचा आवाज ऐकला असं सांगितलं. AIUDFचे आमदार करिमुद्दीन बारभुईया यांनी काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा दावा केला आहे. पंजाबमध्ये अकाली दलाचे आमदार मनप्रीत आयली यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. इतर राज्यात विरोधकांच्या मतात फूट पडलेली असतानाच पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या आमदारांनी सिन्हा यांना मतदान केल्याचं वृत्त आहे.

मतांचं गणित काय?

एकूण मते – 10, 79, 206

एनडीए- 5, 26, 420

यूपीए- 2, 59, 892

इतर- 2,92, 442

विजयासाठी आवश्यक मते – 5,49, 442

एकूण मतदार किती?

लोकसभा – 543 खासदार

राज्यसभा – 233 खासदार

विधानसभा – 4120 आमदार

द्रौपदी मुर्मू : शिक्षिका ते राज्यपाल

द्रौपदी मुर्मू यांचा ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात 20 जून 1958मध्ये जन्म झाला. त्या आदिवासी संथाल कुटुंबातून येतात. त्यांच्या पतीचं नाव श्याम चरण आहे. त्यांनी शिक्षिका म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी क्लर्क म्हणून नोकरी केली. 1997मध्ये त्या नगरसेविका म्हणून विजयी झाल्या. 2000 आणि 2009मध्ये त्या रायगंज विधानसभा मतदारसंघातून दोनदा विजयी झाल्या. मे 2015मध्ये त्या झारखंडच्या राज्यपाल झाल्या.

यशवंत सिन्हा : सनदी अधिकारी ते केंद्रीय अर्थमंत्री

यशवंत सिन्हा यांचा 6 नोव्हेंबर 1937मध्ये पटनाच्या कायस्थ कुटुंबात जन्म झाला. 1960मध्ये ते सनदी अधिकारी बनले. 24 वर्ष सनदी अधिकारी म्हणून काम पाहिल्यानंतर त्यांनी 1984मध्ये आयएएस पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते राजकारणात आले. राजकारणाची सुरुवात त्यांनी जनता पार्टीतून केली. त्यानंतर भाजपमध्ये आले. 1998, 1999, 2009मध्ये ते हजारीबागमधून भाजपच्या तिकीटावर विजयी झाले. नोव्हेंबर 1990 ते जून 1991मध्ये चंद्रशेखर सरकारमध्ये ते अर्थमंत्री झाले. मोदी सरकार आल्यानंतर 2018मध्ये त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.