…म्हणून घेतला राजीनाम्याचा निर्णय; राजन तेली यांचे स्पष्टीकरण, दिपक केसरकरांवरही साधला निशाणा

राजन तेली यांनी भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी त्यांचा राजीनामा नामंजूर केला आहे. त्यानंतर राजन तेली यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

...म्हणून घेतला राजीनाम्याचा निर्णय; राजन तेली यांचे स्पष्टीकरण, दिपक केसरकरांवरही साधला निशाणा
राजन तेली, चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 7:45 PM

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli) यांच्या नेतृत्वात भाजपनं दणदणीत विजय मिळवला. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि विशेष करुन शिवसेनेला मोठा धक्का बसला. मात्र, निवडणुकीत राजन तेली यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर तेली यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत, पुढेही पक्षासाठी काम करत राहणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तेली यांचा राजीनामा नामंजूर केला आहे. यावर आता तेली यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले तेली ?

राजन तेली पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, मी राजीनामा देणार याची वरिष्ठांना एक महिन्यापूर्वीच कल्पना दिली होती. मी कोणावरही नाराज नाही. नवीन लोकांना संधी मिळावी यासाठी मी राजीनाम्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माझा राजीनामा नामंजूर केला आहे. मी यापुढेही पक्षासाठी असेच काम करत राहील.

‘केसरकरांनी भाजपाच्या वाट्याला जाऊ नये’

दरम्यान यावेळी तेली यांनी शिवसेना नेते दीपक केसरकरांवर देखील निशाणा साधला आहे. मी निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असतो तर आम्ही बँकेच्या सर्व जागा जिंकल्या असत्या असे केसरकर यांनी म्हटले होते. यावर आता तेली यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केसरकर यांनी भाजपाच्या वाट्याला जाऊ नये, असे केसरकर यांनी म्हटले आहे. तसेच गेल्या 15 वर्षांपासून केसरकर हे बँकेची जागा वापरत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा उपयोग हा जास्तीत जास्त गरीबांच्या कल्यासाठी करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या 

Ajit Pawar | महाराष्ट्रात निर्बंध कठोर होण्याचा निर्णय केव्हा होणार? अजित पवारांनी स्पष्टपणेच सांगून टाकलं!

मुंबईत 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ, काँग्रेस म्हणते, निर्णय चांगला, पण…

राजन तेली यांचा राजीनामा चंद्रकांतदादांनी फेटाळला, तेलींवर विश्वास व्यक्त करत राजकीय वाटचालीसाठीही शुभेच्छा

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.