Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तरुणांसाठी मोठी घोषणा, घेतला मोठा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांसाठी मोठी घोषणा केली आहे, ते वाराणसीमध्ये बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तरुणांसाठी मोठी घोषणा, घेतला मोठा निर्णय
Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Oct 20, 2024 | 9:18 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी वाराणसीमध्ये मोठी घोषणा केली आहे. आम्ही एक लाख तरुणांना राजकारणात आणणार आहोत, ज्या तरुणांचा कोणत्याही राजकीय कुटुंबांशी संबंध नसेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी वाराणसीमध्ये घराणेशाहीची मानसीकता नष्ट करण्याच्या अभियानाची सुरुवात केली त्यावेळी ते बोलत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरचा मोदी यांचा हा दुसरा वाराणसी दौरा आहे. आपल्या या दौऱ्यामध्ये त्यांनी आज आर जे शंकरा आय हॉस्पिटलचं उद्घाटन केलं तसेच शंकराचार्य स्वामी शंकर विजयेंद्र सरस्वती यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, आम्ही म्हणालो होतो की अयोध्यामध्ये भव्य असं रामाचं मंदिर उभा राहिल. आज अयोध्येमध्ये भव्य असं रामाचं मंदिर निर्माण केलं. आज लाखो लोक रामलल्लाचं दर्शन घेत आहेत.तीन तलाक कायदा देखील आमच्याच सरकारनं आणला. या कायद्यामुळे महिलांचं संरक्षण झालं. एनडीए सरकारनं कधीही गरिबांच्या हक्कावर गदा आणली नाही, उलट गरिबांना दहा टक्के आरक्षण दिलं. ते गरीब आज आम्हाला आर्शीवाद देत आहेत. हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळालं, तिथे सलग तिसऱ्यांदा एनडीएची सत्ता आली. जम्मू काश्मीरमध्ये देखील आम्हाला रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं असंही यावेळी मोदींनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवर जोरदार हल्लाबोल केला.घराणेशाहीमुळे सर्वाधिक नुकसान हे तरुणांचं होत असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.यामुळेच आम्ही असा निश्चित केला आहे की, एक लाख तरुणांना आम्ही राजकारणात आणणार आहोत.ज्यांचा कोणत्याही राजकीय कुटुंबांशी संबंध नसेल असं मोदी यांनी म्हटलं आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल महागणार, आता किती भरावा लागणार टोल?
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल महागणार, आता किती भरावा लागणार टोल?.
नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'
नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'.
नागपुरात कलम 144 लागू, राड्यानंतर तणावपूर्ण शांतता; नेमकं काय घडलं?
नागपुरात कलम 144 लागू, राड्यानंतर तणावपूर्ण शांतता; नेमकं काय घडलं?.
जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....