PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या एकाच व्यासपीठावर! यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कधी टाळली होती भेट?

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यातील देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे उद्धाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारच्या वेळी मुंबईतील जलभूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचे उद्घाटन ते करतील.

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या एकाच व्यासपीठावर! यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कधी टाळली होती भेट?
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 1:02 PM

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून मुंबईतील एका कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकाच व्यासपीठावर दिसतील. मुंबई येथील राजभवनातील क्रांतिकारी गॅलरीचं उद्घाटन नरेंद्र मोदी (Prime minister Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मोदी आणि ठाकरे एका मंचावर उपस्थित राहतील. महाविकास आघाडीचे  (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांविरोधात केंद्रातील भाजप सरकारकारे ईडी आणि सीबीआयच्या कारवाया सुरु केल्याचा आरोप नेहमीच ठाकरे सरकारच्या वतीनं करण्यात येतो. राज्यातील भाजपाला केंद्रातील भाजपचं अभय असल्यानं त्यांनी महाराष्ट्र सरकारवर मोठा दबाव आणल्याचंही बोललं जातं. या पार्श्वभूमीवर दोन्ही परस्पर विरोधी पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्यानं या कार्यक्रमाकडे अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीतही शिवसेनेला भाजपासमोर हार पत्करावी लागली आहे. यामुळे दोन्ही नेते मंचावरून एकमेकांवर काय टीप्पणी करतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मंगळावारी दुपारी कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 14 जून रोजी दुपारी मुंबईतील राजभवानातील या कार्यक्रमाला उपस्थित असतील. दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी येथील क्रांतिकारी गॅलरीचं उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही हजेरी असेल.

यापूर्वी कधी होती एकत्र येण्याची संधी?

यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये स्वर्गीय लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. तेव्हादेखील मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकाच व्यासपीठावर असतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र या पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर उल्लेख नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमालाच जाणे टाळले होते. एप्रिल महिन्यात झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिल्या लता मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्यात काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यातील देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे उद्धाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारच्या वेळी मुंबईतील जलभूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचे उद्घाटन ते करतील. तसेच संध्याकाळी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात ते सहभागी होणार आहेत.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.