AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: अगर काँग्रेस ना होती तो.. PM नरेंद्र मोदींनी सभागृहात पाढा वाचला, काँग्रेसच्या जखमेवर मीठ, प्रचंड गदारोळ

काँग्रेस नसती तर.. चा पाढा वाचताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधींच्या काळात लागलेल्या आणीबाणीपासून महिलांवर झालेले अत्याचार, मुलभूत सुविधांची टंचाई आदी विषयांना हात घातला. या मुद्द्यांवरून सभागृहात गोंधळ उडाला.

VIDEO: अगर काँग्रेस ना होती तो.. PM नरेंद्र मोदींनी सभागृहात पाढा वाचला, काँग्रेसच्या जखमेवर मीठ, प्रचंड गदारोळ
राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 2:20 PM

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल लोकसभेत काँग्रेसवर मोठे आरोप केल्यानंतर आज पुन्हा एकदा राज्यसभेत भाषण करताना काँग्रेसच्या अपयशाचा पाढा वाचला. तसेच देशात आज काँग्रेस (Indian National Congress Party) नसती तर काय काय घडलं असतं, याची एक भली मोठी यादीच वाचून दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अगर काँग्रेस ना होती तो…’ या वाक्यानंतर असंख्य गोष्टी बोलल्या. त्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. काँग्रेस नसती तर.. चा पाढा वाचताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधींच्या (Indira Gandhi) काळात लागलेल्या आणीबाणीपासून महिलांवर झालेले अत्याचार, मुलभूत सुविधांची टंचाई आदी विषयांना हात घातला. या मुद्द्यांवरून सभागृहात गोंधळ उडाला. काँग्रेस खासदारांनी पंतप्रधानांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र सभापती महोदयांनी शांत राहण्याचे आवाहन केले.

अगर काँग्रेस ना होती तो… काय म्हणाले पंतप्रधान?

राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसवर निशाणा साधत म्हणाले, अगर काँग्रेस ना होती… तर काय झाले असते… इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया याच विचारसरणीचा हा परिणाम आहे. मी जरा सविस्तार सांगू इच्छितो. काँग्रेस नसती तर काय झाले असते… महात्मा गांधींनी तर काँग्रेस बरखास्त करण्याची मागणी केली होती. त्यांच्या इच्छेनुसार काँग्रेस बरखास्त झाली असती, हा विचार केला असता तर… लोकशाही घराणेशाहीमुक्त असती. देश विदेशीऐवजी स्वदेशीच्या मार्गावर गेला असता. काँग्रेस नसती तर आणीबाणीचा कलंक आपल्या देशावर लागला नसता. काँग्रेस नसती तर अनेक दशके संस्थागत भ्रष्टाचार चालला नसता. काँग्रेस नसता तर जातीवाद आणि प्रादेशिकवादाची दरी एवढी खोल नसती. काँग्रेस नसती तर शीखांचा नरसंहार झाला नसता. वर्षानुवर्षे पंजाबी माणूस दहशवादाच्या छायेत जगला नसता. काँग्रेस नसता तर कश्मीरच्या पंडितांना राज्य सोडावे लागले नसते. काँग्रेस नसते तर मुलींना तंदूरमध्ये गाडण्याच्या घटना घडल्या नसत्या. काँग्रेस नसती तर देशातील सामान्य माणसाला घर, रस्ते, वीज, पाणी, शौचालय, एवढ्या मूलभूत सुविधांसाठी एवढी प्रतीक्षा करावी लागली नसती.

काँग्रेसवरील टीकेनंतर सभागृहात गोंधळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काँग्रेसवरील टीकेनंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला. काँग्रेस सदस्यांनी जोरदार विरोध करायला सुरुवात केली. मात्र सभापतींनी वातावरण शांत ठेवण्याचे आवाहन केले. त्यानंतर पंतप्रधानांचे भाषण पुन्हा एकदा सुरु झाले.

इतर बातम्या-

PM Narendra Modi: अचानक दृष्टी गेल्यानंतर जसं होतं तसंच 2014नंतर सत्ता गमावल्यावर काँग्रेसचं झालंय; पंतप्रधान मोदींचा घणाघाती हल्ला

प्रधानमंत्रीजी आपसे नाराज नही, हैरान हूँ, तुम्ही आम्हाला सुपर स्प्रेडर का म्हणालात?; सुप्रिया सुळेंचा सवाल

पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.