Modi cabinet expansion 2021 : प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता, मोदी कॅबिनेट विस्ताराच्या हालचाली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोरदार सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत शुक्रवारी बैठक घेतली होती.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोरदार सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत शुक्रवारी बैठक घेतली होती. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दोन दिवस दिल्लीत तळ ठोकला होता. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातून दोन नावं मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. यामध्ये भाजप खासदार नारायण राणे यांचं आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचं नाव चर्चेत आहे. (Pritam Munde may be get post of minister in Narendra Modi Government cabinet expansion 2021)
नारायण राणे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांचं नाव चर्चेत येत ना येतं तोच प्रीतम मुंडे यांचंही नाव मंत्रिपदाच्या रेसमध्ये आलं आहे. जर येत्या कॅबिनेट विस्तारामध्ये प्रीतम मुंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं तर, गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबात दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपद जाईल.
प्रीतम मुंडे दुसऱ्यांदा लोकसभेत
डॉ. प्रीतम मुंडे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये दणदणीत विजय मिळवून खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. विष्णू जाधव हे निवडणूक रिंगणात होते. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात प्रमुख लढत झाली. अखेर डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारावर 1 लाख 78 हजार 920 मतांनी दणदणीत विजय मिळवला होता. राजकीय क्षेत्रासोबत प्रीतम मुंडे सामाजिक कामातही अग्रेसर असतात. गोपीनाथ मुंडे यांचं अपघातात निधन झाल्यानंतर पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे त्यांच्या जागेवर निवडून आल्या होत्या.
नारायण राणेंच्या नावाची देखील चर्चा
सध्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु आहे. मोदी कॅबिनेटमध्ये काही मंत्रिपदांची आदलाबदली, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. त्यातच महाराष्ट्रातील एका भाजप नेत्यांचं केंद्रीय मंत्रिपद धोक्यात असल्याची कुजबूज आहे. त्यामुळे त्यांना हटवून नारायण राणेंसारखा आक्रमक चेहरा दिला जाऊ शकतो.
शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न ?
दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा शिवसेनेला थेट अंगावर घेण्याचा मुद्दा असो, सध्या भाजपकडे नारायण राणे यांच्यासारखा दुसरा नेता नाही. त्यामुळे ठाकरे सरकारला थेट चॅलेंज देऊन, कोकणात भाजप वाढविण्यासाठी नारायण राणे यांची मदत होऊ शकते, असा अंदाज आहे.
नारायण राणे दिल्लीला रवाना, मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चिन्हंhttps://t.co/WIYTl1rnme #NarayanRane | #BJP | #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 14, 2021
संबंधित बातम्या
नारायण राणे दिल्लीला रवाना, मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चिन्हं