“तुम्ही उन्हात, आम्ही सावलीत कसं बसावं, हे आघाडीतल्या कार्यक्रमाचं स्टेज नाही,” भगवान गडावर प्रीतम मुंडेंची फटकेबाजी

मेळाव्याला अपस्थित असलेल्या हजारो लोकांना प्रीतम मुंडे यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी जोरदार भाषण करत महाविकास आघाडीवर टीकेचे आसूड ओढले. "तुम्ही उन्हात बसेलेले आहात. आम्ही सावलीत कसं बसावं, हे काही आघाडीतल्या कार्यक्रमाचं स्टेज नाही," असं प्रीतम मुंडे म्हणाल्या आहेत.

तुम्ही उन्हात, आम्ही सावलीत कसं बसावं, हे आघाडीतल्या कार्यक्रमाचं स्टेज नाही, भगवान गडावर प्रीतम मुंडेंची फटकेबाजी
pritam munde
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 3:07 PM

बीड ( सावरगाव) : दसऱ्यानिमित्त सावरगाव येथे भगवानगडावर मोठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे तसेच भाजप खासदार प्रीतम मुंडे यांची या मेळाव्याला विशष अपस्थिती आहे. मेळाव्याला अपस्थित असलेल्या हजारो लोकांना प्रीतम मुंडे यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी जोरदार भाषण करत महाविकास आघाडीवर टीकेचे आसूड ओढले. “तुम्ही उन्हात बसेलेले आहात. आम्ही सावलीत कसं बसावं, हे काही आघाडीतल्या कार्यक्रमाचं स्टेज नाही,” असं प्रीतम मुंडे म्हणाल्या आहेत.

मला अशा संपत्तीचा सार्थ अभिमान 

राजकारणात आल्यानंतर काही लोक इस्टेट कमवातात. गाड्या घेतात. बंगले बांधतात. प्रॉपर्टी वाढवतात. पण आमच्या वडिलांनी जी संपत्ती जमा करुन ठेवली आहे, ती आज तुमच्या रुपाने अपस्थित आहे. ही संपत्ती कधी चोरी होत नाही. तिला कोणी खर्च करु शकत नाही. अशा या संपत्तीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मी गोपीनाथ मुंडे यांच्याकडे एकच मागणं मागितलं. मला सकारात्मक उर्जा देण्याचं मागणं केलं, असेदेखील प्रीतम मुंडे म्हणाल्या.

हा काही आघाडीच्या कार्यक्रमातील स्टेज नाही

बोलण्यासारखं खूप काही आहे. तुम्ही सगळे उन्हात बसलेले आहेत. मी एकटी सावलीत बसून भाषण करेल तर मी मुंडे यांचा वारसा चावलणारी आहे, असं वाटणार नाही. मला वाटलं होतं की मी स्टेजवर सावली राहावी म्हणून काहीतरी करायला हवं. पण नंतर लक्षात आलं की हा काही आघाडीच्या कार्यक्रमातील स्टेज नाही. हा समाजातील वंचितांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेला स्टेज आहे. मी तुमच्यासोबत उन्हात, दुष्काळात, संकटात आहे,” असे प्रीतम मुंडे म्हणाल्या.

अतिवृष्टीमुळे मेळावा होईल की नाही ? किती मोठा होईल, ही लोकांच्या मनात शंका होती. लोकांनी हा उसळलेला जनसागर पाहा. हा भगवानबाबांचा आशीर्वाद आणि मुंडे साहेबांच्या संस्काराचे प्रतिक आहे. नवरात्रीचा सण आहे. आपण देवीचे मायाळू सहनशील रुप पाहतो. पंकजा मुंडे मंत्री असताना तुम्ही हे मायाळू रुप पाहिलं. पण दुर्गाष्टमी झाली. जेव्हा समाजात अन्याय अत्याचार होतो. तेव्हा दुर्गादेवीचं आक्रमक रुपही पाहिलं, असं प्रीतम मुंडे म्हणाल्या.

इतर बातम्या :

‘संजय राऊत मोठा माणूस, पण निकालानंतरच काय ते कळेल,’ पुणे पालिका निवडणुकीवरुन गिरीश बापट आक्रमक

कामठीत लवकरच बुद्धिस्ट थीम पार्कचा प्रकल्प राबवू; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

पद्मसिंह पाटलांनी बहीण दिली, घरचे सांगायचे, पोरगं डायरेक्टरयं, अजित पवारांनी सांगितला लग्नाचा किस्सा

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.