काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधींच्या बिनविरोध निवडीला पृथ्वीराज चव्हाण यांचा विरोध
काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी यांनीच राहावं अशी काँग्रेसच्या काही नेत्यांची इच्छा आहे. याला राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कडाडून विरोध आहे.
मुंबई : काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक (Congress Presidential Election) होतेय. काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीच राहावं अशी काँग्रेसच्या काही नेत्यांची इच्छा आहे. याला राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचा कडाडून विरोध आहे. राहुल गांधी यांच्या बिनविरोध निवडीचा ठराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने काल मंजूर केला. हा ठराव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडला. त्याला माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांनी त्याला अनुमोदन दिलं. उपस्थित सर्व प्रतिनिधींनी त्याला हात उंचावून समर्थन दिलं. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावेळी हातवर केला नाही. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी आणि राहुल गांधी यांनी त्यात भाग घ्यावा, अशी पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका आहे. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या G-23 गटातील आहेत. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा, अशी G-23 गटाची मागणी आहे. त्यामुळे त्यांचा राहुल गांधी यांच्या बिनविरोध निवडीला विरोध आहे.