Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prithviraj Chavan : कॉंग्रेसमधील सध्याची परिस्थिती चिंताजनक, राहूल गांधी चार वर्षापासून भेटले नाहीत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली खंत

congress news : पृथ्वीराज चव्हाण जेव्हा दिल्लीत असतात तेव्हा ते अधूनमधून डॉ. मनमोहन सिंग यांना भेटतात, त्यांची प्रकृती आता पूर्वीसारखी राहिली नाही. ते रूग्णालयात आहेत, तरीही ते वेळ मागितल्यावर बोलायला तयार असतात. तसेच सोनिया गांधी यांच्याकडे वेळ मागितल्यावर त्या सुद्धा भेटतात.

Prithviraj Chavan : कॉंग्रेसमधील सध्याची परिस्थिती चिंताजनक, राहूल गांधी चार वर्षापासून भेटले नाहीत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली खंत
कॉंग्रेसमधील सध्याची परिस्थिती चिंताजनकImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 7:10 AM

नवी दिल्ली – आठ वर्षापूर्वी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं सरकार दिल्लीत सत्तेत आलं आणि कॉंग्रेसला (Congress) उतरती कळा लागली. तेव्हापासून कॉंग्रेस राजकारणात देशात चाचपडत असल्याचं पाहायला मिळतं आहे. अनेक राज्यातील सत्ता गेल्याने थेट कॉंग्रेस नेतृत्वावरती अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच कॉंग्रेसमधील नेत्यांमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचे देखील वारंवार उघडकीस आले आहे. नुकतेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी राहूल गांधी (Rahul Gandhi) यांना मागच्या चार वर्षात भेटलो नाही असं विधान केलं आहे. हे वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. उदयपूर येथे नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात कोणतेही चिंतन किंवा आत्मपरीक्षण झाले नाही, असे देखील चव्हाण यांनी सांगितले आहे.

राहूल गांधीची चार वर्षापासून भेट नाही

पृथ्वीराज चव्हाण जेव्हा दिल्लीत असतात तेव्हा ते अधूनमधून डॉ. मनमोहन सिंग यांना भेटतात, त्यांची प्रकृती आता पूर्वीसारखी राहिली नाही. ते रूग्णालयात आहेत, तरीही ते वेळ मागितल्यावर बोलायला तयार असतात. तसेच सोनिया गांधी यांच्याकडे वेळ मागितल्यावर त्या सुद्धा भेटतात. परंतु राहूल गांधी यांना मागच्या चार वर्षापासून भेटता आले नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

प्रामाणिक आत्मपरीक्षण व्हायला हवे

उदयपूरच्या चिंतन बैठकीबद्दल त्यांनी अनेक वक्तव्ये केली आहेत. काँग्रेस अध्यक्षांनी पक्षासमोर निर्माण झालेल्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी चिंतन शिबिर आयोजित करण्याचे मान्य केले होते. परंतु कोणीतरी “राजापेक्षा अधिक निष्ठावान” असा निर्णय घेतला की चिंतन किंवा आत्मपरीक्षण करण्याची गरज नाही. त्यामुळे उदयपूरची बैठक नवसंकल्प शिबिर होती. पक्षाला असे वाटले की शवविच्छेदनाची गरज नाही आणि फक्त भविष्याकडे पाहण्याची गरज आहे. प्रामाणिक आत्मपरीक्षण व्हायला हवे असंही चव्हाण म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मोदींचा पराभव करण्यासाठी व्यापक युती करावी लागेल

2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करायचा असेल, तर येत्या 12 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करावी लागेल असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. तसेच सगळ्यांना मिळून एक समविचारी पक्षांची एक मोठी युती तयार करावी लागेल.

समजा 2024 मध्ये आपला पराभव झाल्यास उदारमतवादी लोकशाहीचा आत्मा नष्ट होईल असंही त्यांनी जाणीवपूर्वक सांगितलं.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.