काय मूर्खपणा सुरुय, सगळ्यांना माहितंय, राहुल गांधी हिंदुस्थानी आहे : प्रियांका गांधी
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारतीय नागरिकत्वावरुन प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी तर केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून, राहुल गांधी ब्रिटीश असल्याचा आरोप केला. त्यानंतर गृहमंत्रालयाने राहुल गांधींना नोटीस पाठवत, 15 दिवसात उत्तरही मागवलं आहे. त्यानंतर आता राहुल गांधी यांची बहीण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी प्रतिक्रिया […]
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारतीय नागरिकत्वावरुन प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी तर केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून, राहुल गांधी ब्रिटीश असल्याचा आरोप केला. त्यानंतर गृहमंत्रालयाने राहुल गांधींना नोटीस पाठवत, 15 दिवसात उत्तरही मागवलं आहे. त्यानंतर आता राहुल गांधी यांची बहीण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संपूर्ण वादावर संतप्त प्रतिक्रिया देत, राहुल गांधींच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मूर्ख म्हटलं आहे.
प्रियांका गांधी काय म्हणाल्या?
“संपूर्ण हिंदुस्थानला माहित आहे की, राहुल गांधी हिंदुस्थानी आहे. राहुल गांधी यांचा हिंदुस्थानात जन्म झाला, इथेच तो लहानाचा मोठा झाला आहे. तरी त्याच्या नागरिकत्वावरुन प्रश्न उपस्थित केले जात आहेत, काय मूर्खपणा आहे?” असे राहुल गांधी यांची बहीण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी म्हणाल्या.
#WATCH Priyanka Gandhi Vadra on MHA notice to Rahul Gandhi over citizenship, says,” The whole of India knows that Rahul Gandhi is an Indian. People have seen him being born and grow up in India. Kya bakwaas hai yeh?” pic.twitter.com/Rgt457WMoi
— ANI (@ANI) April 30, 2019
नेमका वाद कधी सुरु झाला?
भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारतीय नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी हे भारतीय नागरिक नसून, ब्रिटीश नागरिक आहेत, असा दावा सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला. सुब्रह्मण्यम स्वामींच्या आरोपानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने राहुल गांधी यांच्याकडे 15 दिवसात उत्तर मागितले आहे. तशी नोटीसही केंद्रीय गृहमंत्रालयाने राहुल गांधी यांना पाठवली आहे.
कोण आहेत राहुल गांधी?
राहुल गांधी हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. भारताच्या माजी पंतप्रधान ‘आयर्न लेडी’ इंदिरा गांधी या राहुल गांधी यांच्या आजी असून, भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी हे राहुल गांधी यांचे वडील आहेत. आजी आणि वडिलांची हत्या झाल्याने, राहुल गांधी यांनी शिक्षणादरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव नाव बदलून शिक्षण घेतलं. अत्यंत संवेदनशील स्थिती जीवन जगलेल्या राहुल गांधी यांनी पुढे राजकारणात प्रवेश केला. आधी सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्ता, नंतर अमेठीचे खासदार आणि आता काँग्रेसचे अध्यक्ष, असा राजकीय प्रवास राहुल गांधी यांचा आहे.
VIDEO : राहुल गांधींच्या नागरिकत्वावरुन भाजप आणि काँग्रेसची पत्रकार परिषद :