पाच वर्षात राजू शेट्टींची संपत्ती दुप्पट, पाहा संपूर्ण तपशील

कोल्हापूर : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. पहिल्या दोन टप्प्यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर, आता तिसऱ्या आणि टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केला. त्यामुळे राजू शेट्टी […]

पाच वर्षात राजू शेट्टींची संपत्ती दुप्पट, पाहा संपूर्ण तपशील
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

कोल्हापूर : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. पहिल्या दोन टप्प्यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर, आता तिसऱ्या आणि टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केला. त्यामुळे राजू शेट्टी यांची संपत्तीही समोर आली आहे. गेल्या पाच वर्षात राजू शेट्टी यांची संपत्ती दुुप्पट झाली आहे. अर्थात, राजू शेट्टी यांनी संपत्ती दुप्पट होण्याची कारणेही प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहेत.

राजू शेट्टी यांची संपत्ती :

  • रोख शिल्लक – 27 हजार रुपये
  • बँक शिल्लक – 14 लाख 7 हजार 405 रुपये
  • शेअर्स रक्कम – 2 लाख 33 हजार 250 रुपये
  • विमा रक्कम – 19 लाख 24 हजार 194 रुपये
  • वहान – 15 लाख 47 हजार 700 रुपये
  • सोन्याचे दागिने – 5 लाख 58 हजार 790 रुपये
  • शेत जमीन – 27 लाख 70 हजार 250 रुपये
  • गुंतवणूक : स्वाभिमानी दूध – 25 लाख 90 हजार रुपये
  • गुंतवणूक : स्वाभिमानी एमआयडीसी – 53 लाख 69 हजार रुपये
  • इतर गुंतवणूक – 5 लाख 30 हजार रुपये
  • घर बांधकाम – 74 लाख 63 हजार 800 रुपये
  • कर्ज रक्कम – 7 लाख 74 हजार 59 रुपये

2014 साली राजू शेट्टी यांची एकूण मालमत्ता 83 लाख 87 हजार रुपये होती. आता म्हणजे 2019 साली तीच मालमत्ता 2 कोटी 36 लाख रुपये एवढी झाली आहे. या मालमत्ता वाढीची कारणंही राजू शेट्टी यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहेत.

राजू शेट्टी यांची संपत्ती वाढण्याची कारणे :

खासदार राजू शेट्टी यांनी मुंबई येथील फ्लॅट विकल्याने संपत्तीत 98 लाखाची वाढ झाली आहे. तसेच, सरकारी मूल्यांकनाप्रमाणे जमिनीत 10 लाख 70 हजारांची वाढ झाली आहे. शिवाय, लोकवर्गणीतून घरबांधणीसाठी 22 लाखांचा समावेश करण्यात आला असून, शासकीय पगार आणि भत्ता याचाही संपत्ती विवरणपत्रात समावेश केला असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

राजू शेट्टी यांच्या संपत्तीचा तपशील :

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....