AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navneet Rana : बंडखोरांच्या कुटुंबीयांना केंद्राची सुरक्षा द्या, नवनीत राणांची मागणी, ठाकरेंना उद्देशून केलं महत्त्वाचं विधान

नवनीत राणा म्हणाल्यात, शिवसेनेच्या 38 आमदारांची सही असलेले पत्र एकनाथ शिंदे गटामध्ये खरी शिवसेना आहे. बाळासाहेबांसोबत काम करणारे खरे शिवसैनिक आहेत. हिंदुत्वासाठी त्यांनी कित्तेक वर्षापासून काम केलं. उद्धव ठाकरे यांच्यापासून आता ते दूर गेले आहेत.

Navneet Rana : बंडखोरांच्या कुटुंबीयांना केंद्राची सुरक्षा द्या, नवनीत राणांची मागणी, ठाकरेंना उद्देशून केलं महत्त्वाचं विधान
बंडखोरांच्या कुटुंबीयांना केंद्राची सुरक्षा द्या, नवनीत राणांची मागणी
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 1:21 PM

अमरावती : राजकीय आकसापोटी शिवसेनेतील (Shiv Sena) एकनाथ शिंदे समर्थक (Eknath Shinde supporters) आमदारांची सुरक्षाव्यवस्था काढली, असा आरोप शिंदे गटानं केलाय. त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. आमदारांच्या कुटुंबीयांना धमकवण्याचा प्रयत्न होतोय, असंही त्यांचं म्हणणंय. आमदारांच्या कुटुंबीयांना काही झालं तर मुख्यमंत्री, शरद पवार, आदित्य ठाकरे, संजय राऊत जबाबदार असतील, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना यासंदर्भात पत्र लिहिलंल. यावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची आहे. कुटुंबीयांनी नाही, असं वक्तव्य केलंय. त्यात खासदार नवनीत राणा यांनी उडी घेतली. बंडखोरांच्या कुटुंबीयांना केंद्राची सुरक्षा द्या, अशी मागणी नवनीत राणा यांनी दिली. याशिवाय ठाकरेंना उद्देशून त्यांनी काही महत्त्वाचं विधान केलंय.

शिंदे गट हीच खरी सेना

नवनीत राणा म्हणाल्यात, शिवसेनेच्या 38 आमदारांची सही असलेले पत्र एकनाथ शिंदे गटामध्ये खरी शिवसेना आहे. बाळासाहेबांसोबत काम करणारे खरे शिवसैनिक आहेत. हिंदुत्वासाठी त्यांनी कित्तेक वर्षापासून काम केलं. उद्धव ठाकरे यांच्यापासून आता ते दूर गेले आहेत. परंतु, त्यांना बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवायचे आहेत. एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं की, आम्ही उद्धव ठाकरे यांचे सैनिक नाहीत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक आहोत.

संजय राऊतांच्या बोलण्याचा अर्थ काय?

उद्धव ठाकरेंनी या महाराष्ट्रात आतापर्यंत गुंड निर्माण केले आहेत. त्या गुंडांचा वापर केला जात आहे. अशीच गुंडगिरीची भाषा खासदार संजय राऊत वापरत आहेत. ते एक जबाबदार व्यक्ती आहेत. राऊत म्हणतात की, आमदारांना सुरक्षा आहे. पण, त्यांच्या कुटुंबीयांना नाही. याचा अर्थ काय असा सवाल राणा यांनी राऊत यांना विचारला. आमदारांच्या कुटुंबीयांना मारणार आहोत का, तुम्ही आमदारांना सरळ-सरळ धमकी देत आहोत. त्यांना आम्ही मारून टाकू म्हणून. आमच्यासोबत परत आले नाही तर… एवढे वरिष्ठ आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेत, असही नवनीत राणा यांनी स्पष्ट केलंय.

हे सुद्धा वाचा

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.