मतदानाला उरले 2 दिवस, सभांची शेवटची संधी, कसबा चिंचवडमध्ये आज कोण कोण? वाचा Updates!

कसबा पेठ आणि चिंचवडमधील मतदान येत्या 26 फेब्रुवारी रोजी आहे. तर निवडणुकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर करण्यात येईल. प्रचार

मतदानाला उरले 2 दिवस, सभांची शेवटची संधी, कसबा चिंचवडमध्ये आज कोण कोण? वाचा Updates!
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 8:44 AM

Pune Bypoll election : योगेश बोरसेः  पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीच्या मतदानासाठी फक्त 2 दिवस उरले आहेत. राजकीय नेत्यांच्या सभांसाठी आजचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे भाजप आमि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते आज मैदानात उतरत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये घेणार रोड शो घेणार आहेत. तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची कसब्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. राज्यात एकिकडे सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची लढाई अंतिम टप्प्यात आली असताना कसबा पेठ आणि चिंचवडमधील प्रचारही शिगेला पोहोचाल आहे.

कसबा-चिंचवडमध्ये आज कोण-कोण?

– कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात आज भाजपचे उमेदवार हेमंत रासणे यांच्या प्रचारासाठी भाजपचे गेमचेंजर म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस हे जाहीर सभा घेणार आहे. पुण्यातील भिडे पूलापासून ते पदयात्रा काढणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डेक्कनच्या नदीपात्रात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. – तर चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांच्या प्रचारासाठी अजित पवार सभादेखील घेणार आहेत.

– राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांचाही सकाळी चिंचवडमध्ये रोड शो आयोजित करण्यात आला आहे.

– चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सभा घेणार आहेत.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला…

विधान परिषद निवडणुकीत भाजपाला मोठी हार पत्करावी लागल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नवा उत्साह संचारला आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाने या पोट निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तर अनेक दिवसांपासून पुण्यात तळ ठोकून आहेत

उमेदवार कोण-कोण?

कसबा पेठेत भाजपने हेमंत रासणे यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीने काँग्रेसचे उमेदवार हेमंत रासणे यांना मैदानात उतरवलं आहे. चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे उभे आहेत. तर राहुल कलाटे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीला येथे फटका बसण्याची शक्यता आहे.

मतदानाला उरले २ दिवस…

कसबा पेठ आणि चिंचवडमधील मतदान येत्या 26 फेब्रुवारी रोजी आहे. तर निवडणुकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर करण्यात येईल. प्रचार

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.