PUNE MNP WARD 22
Image Credit source: TV9 marathi
पुणे: पुणे महापालिका प्रभाग रचनेनंतर प्रत्येक पक्षाकडून महापालिका काबीज करण्यासाठी जोर लावला जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) विरोधात भाजप असा थेट सामाना पुण्यात महापालिकेच्या निवडणुकीत पहायला मिळणार आहे. तर यावेळी ही महापालिका भाजपच्या (BJP) ताब्यात होती. अनेक प्रश्नांमुळे भाजप अडचणीत आली होती. तर या निवडणूकीत भाजपला त्याच प्रश्नांवरून अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून रणनिती आखली जात आहे. पुणे महापालिका आपल्याचकडे रहावी म्हणून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट यांनी दंड थोपटले आहेत. तर अजित पवारांनी आपले संपूर्ण लक्ष हे या निवडणुकीवर केंद्रीत केले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीला खिंडीत अडवण्यासाठी मनसेकडून प्रयत्न केले जाणार आहेत. तर सेनेनेही आपले दोन सेनापती पुण्यात उतरवले आहेत. त्यामुळे पुण्याची ही महापालिका निवडणूक गाजणार हे नक्की. वॉर्ड क्रमांक 22 (Ward No 22 Pune) मध्ये तर उत्सुकतेनं निवडणुकीची वाट पाहिली जातीये. या निवडणुकीत काय चमत्कार होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
2017 च्या महापालिका निवडणुकीत जिंकलेले उमेदवार
- (22) अ मुंढवा मगरपट्टा सिटी- चेतन विठ्ठल तुपे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी
- (22) ब मुंढवा मगरपट्टा सिटी- हेमलता निलेश मगर नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी
- (22) क मुंढवा मगरपट्टा सिटी- चंचला संदीप कोद्रे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी
- (22) ड मुंढवा मगरपट्टा सिटी- चंचला संदीप कोद्रे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी
वॉर्ड क्रमांक 22 एकूण लोकसंख्या
- एकूण लोकसंख्या -61878
- अनुसूचित जाती – 11494
- अनुसूचित जमाती – 1182
वॉर्ड क्रमांक 22 A
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी (Win/Lead) |
शिवसेना | | |
भाजप | | |
राष्ट्रवादी काँग्रेस | | |
काँग्रेस | | |
मनसे | | |
अपक्ष / इतर | | |
वॉर्ड क्रमांक 22 B
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी (Win/Lead) |
शिवसेना | | |
भाजप | | |
राष्ट्रवादी काँग्रेस | | |
काँग्रेस | | |
मनसे | | |
अपक्ष / इतर | | |
वॉर्ड क्रमांक 22 C
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी (Win/Lead) |
शिवसेना | | |
भाजप | | |
राष्ट्रवादी काँग्रेस | | |
काँग्रेस | | |
मनसे | | |
अपक्ष / इतर | | |
वॉर्ड 22 महत्त्वाची ठिकाणं
- व्याप्ती : मांजरी, शेवाळवाडी, केशवनगर, लोणकर नगर, श्री दत्त हौसिंग सोसायटी, हरपळे लॉन्स, कामठे मळा, मांजरी ग्रीन सोसायटी, | गोडबोले वस्ती, मनपा सिव्हेज वॉटर ट्रीटमेंट प्लॅट, शिवकृष्ण सोसायटी, व्हर्टिकल ओरियाना सोसायटी, शरद नगर, गोदरेज रिझरवॉयर सोसायटी, गोदरेज इन्फिनिटी, पुर्वांकरा सिल्व्हर सैंड, मुंढवा जॅकवेल, इंद्रप्रस्थ लॉन्स, साईनाथ कॉलनी, रिव्हरपार्क सोसायटी इ.
- उत्तर : खराडी मुंढवा बायपास रस्ता मुळा मुठा नदीस जेथे मिळतो तेथून पूर्वेस मुळा मुठा नदीने मौजे मांजरी बुद्रुक व मौजे लोणी काळभोर यांच्या हद्दीस मिळेपर्यंत.
- पूर्व : मुळा मुठा नदी मौजे मांजरी बुद्रुक व मौजे लोणी काळभोर यांच्या हद्दीस जेथे मिळते तेथून दक्षिणेस मौजे मांजरी बुद्रुक व मौजे लोणी काळभोर यांचे हद्दीने मौजे फुरसुंगीच्या हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस व पुढे दक्षिणेस मौजे फुरसुंगी – लोणी काळभोर यांच्या हद्दीने नवीन कालव्यास मिळेपर्यंत. (फुरसुंगी ग्रामपंचायत वॉर्ड क्र. ५ ची दक्षिणेकडील हद्द)
- दक्षिण : मौजे फुरसुंगी लोणी काळभोर यांची हद्दी नवीन कालव्यास जेथे मिळते (फुरसुंगी ग्रामपंचायत वॉर्ड क्र. ५ ची दक्षिणेकडील हद्द) तेथून पश्चिमेस नवीन कालव्याने मौजे फुरसुंगी व मौजे हडपसर यांच्या हद्दीस मिळेपर्यंत. (गंगानगरची उत्तरेकडील हद्द)
- पश्चिम : नवीन कालवा मौजे फुरसुंगी व मौजे हडपसर यांच्या हद्दीस जेथे मिळतो (गंगानगरची उत्तरेकडील हद्द) तेथून उत्तरेस मौजे फुरसुंगी व मौजे हडपसर यांच्या हद्दीने व पुढे मौजे हडपसर व मौजे मांजरी बुद्रुक यांच्या हद्दीने (मांजरी बुद्रुक वॉर्ड क्र. ६ ची पश्चिम हद्दीने व वॉर्ड क्र. १ च्या पूर्वेकडील हद्दीने) पुढे पुणे सोलापूर रेल्वे लाईनला मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस पुणे सोलापूर रेल्वे लाईनने मौजे मांजरी बुद्रुक व मौजे साडेसतरा नळीच्या हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर हद्दीने मौजे केशव नगर व मौजे साडे सतरानळीच्या हद्दीस मिळेपर्यंत तेथून पुढे पश्चिमेस सदर हद्दीने मौजे केशवनगर ग्रामपंचायत वॉर्ड क्र. १ च्या पूर्वेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस व पुढे पूर्वेस सदर हद्दीने मौजे केशवनगर ग्रामपंचायत बॉर्ड क्र. २ च्या पूर्वेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर हद्दीने मौजे केशवनगर ग्रामपंचायत वॉर्ड क्र. ३ व ४ च्या दक्षिणेकडील | हद्दीस (मुंढवा रस्त्यास) मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस मुंढवा रस्त्याने खराडी मुंढवा रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस खराडी मुंढवा रस्त्याने मुळा मुठा नदीस मिळेपर्यंत.