पुणे: पुणे महापालिका प्रभाग रचनेनंतर प्रत्येक पक्षाकडून महापालिका काबीज करण्यासाठी जोर लावला जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) विरोधात भाजप असा थेट सामाना पुण्यात महापालिकेच्या निवडणुकीत पहायला मिळणार आहे. तर यावेळी ही महापालिका भाजपच्या (BJP) ताब्यात होती. अनेक प्रश्नांमुळे भाजप अडचणीत आली होती. तर या निवडणूकीत भाजपला त्याच प्रश्नांवरून अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून रणनिती आखली जात आहे. पुणे महापालिका आपल्याचकडे रहावी म्हणून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट यांनी दंड थोपटले आहेत. तर अजित पवारांनी आपले संपूर्ण लक्ष हे या निवडणुकीवर केंद्रीत केले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीला खिंडीत अडवण्यासाठी मनसेकडून प्रयत्न केले जाणार आहेत. तर सेनेनेही आपले दोन सेनापती पुण्यात उतरवले आहेत. त्यामुळे पुण्याची ही महापालिका निवडणूक गाजणार हे नक्की. वॉर्ड क्रमांक 19 (Ward No 19 Pune) मध्ये तर उत्सुकतेनं निवडणुकीची वाट पाहिली जातीये. या निवडणुकीत काय चमत्कार होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
2017 च्या महापालिका निवडणुकीत जिंकलेले उमेदवार
- लोहियानगर कासेवाडी (19) अ – अविनाश रमेश बागवे – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- लोहियानगर कासेवाडी (19) ब – लडकत मनिषा संदीप – भारतीय जनता पार्टी
- लोहियानगर कासेवाडी (19) क- पाटील अर्चना तुषार -भारतीय जनता पार्टी
- लोहियानगर कासेवाडी (19) ड – रफिक अब्दुल रहीम शेख- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वॉर्ड क्रमांक 19 अ
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
भारतीय जनता पार्टी | | |
शिवसेना | | |
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | | |
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी | | |
महाराष्ट्र नवनिर्माण सेना | | |
अपक्ष | | |
वॉर्ड क्रमांक 19 ब
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी
|
भारतीय जनता पार्टी | | |
शिवसेना | | |
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | | |
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी | | |
महाराष्ट्र नवनिर्माण सेना | | |
अपक्ष | | |
वॉर्ड क्रमांक 19 क
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
भारतीय जनता पार्टी | | |
शिवसेना | | |
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| | |
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी | | |
महाराष्ट्र नवनिर्माण सेना | | |
अपक्ष | | |
वॉर्ड 19 ची लोकसंख्या
- एकूण लोकसंख्या- 58994
- अनुसूचित जाती लोकसंख्या- 8785
- अनुसूचित जमाती लोकसंख्या- 552
आरक्षण
19 अ – अनुसूचित जाती
19 ब – सर्वसाधारण महिला
19 क – सर्वसाधारण
प्रभाग क्र : 19 रास्तापेठ प्रभागातील महत्त्वाची ठिकाणं
- के. ई. एम. हॉस्पिटल रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तर पूर्वेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर | रस्त्याने मालधक्का चौक व स्टेशन रस्ता ओलांडून मुदलीयार रस्त्यास मिळेपर्यंत.
- पूर्व : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता मुदलीयार रस्त्यास जेथे मिळतो तेथून पश्चिमेस मुदलियार रस्त्याने राज गोपालाचारी चौकात पं. जवाहरलाल नेहरू रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस पं. जवाहरलाल नेहरू रस्त्याने संत कबीर चौकात लक्ष्मी रस्त्यास मिळेपर्यंत.
- दक्षिण : पं. जवाहरलाल नेहरू रस्ता संत कबीर चौकात लक्ष्मी रस्त्यास जेथे | मिळतो तेथून पश्चिमेस लक्ष्मी रस्त्याने जगताप रस्त्यास मिळेपर्यंत..
- पश्चिम : लक्ष्मी रस्ता जगताप रस्त्यास जेथे मिळतो तेथून उत्तरेस जगताप रस्त्याने नागझरी नाल्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस नागझरी | नाल्याने दारूवाला पुला जवळ गणेश रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस गणेश रस्त्याने महाराणा प्रताप रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस महाराणा प्रताप रस्त्याने अगरवाल रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस नागझरी नाल्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस नागझरी नाल्याने वीर संताजी घोरपडे रस्त्यास मिळेपर्यंत.
- व्याप्ती – सोमवार पेठ, मंगळवार पेठ पार्ट, ससून हॉस्पिटल कॉर्टर्स, सोमवार पेठ पोलिस वसाहत, समर्थ पोलिस ठाणे, कमला नेहरू रुग्णालय, सहजानंदनगर, सिंचन भवन, बाबूराव सणस शाळा, साई पार्क, रास्ता पेठ पार्ट इ.