PMC Election 2022 Ward 20: वॉर्ड क्रमांक 20 वर कुणाचं वर्चस्व राहणार? या निवडणुकीत काय चमत्कार होणार?
तर या निवडणूकीत भाजपला त्याच प्रश्नांवरून अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून रणनिती आखली जात आहे. पुणे महापालिका आपल्याचकडे रहावी म्हणून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट यांनी दंड थोपटले आहेत.
PUNE MNC WARD 20
Image Credit source: TV9 marathi
पुणे: पुणे महापालिका प्रभाग रचनेनंतर प्रत्येक पक्षाकडून महापालिका काबीज करण्यासाठी जोर लावला जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) विरोधात भाजप असा थेट सामाना पुण्यात महापालिकेच्या निवडणुकीत पहायला मिळणार आहे. तर यावेळी ही महापालिका भाजपच्या (BJP) ताब्यात होती. अनेक प्रश्नांमुळे भाजप अडचणीत आली होती. तर या निवडणूकीत भाजपला त्याच प्रश्नांवरून अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून रणनिती आखली जात आहे. पुणे महापालिका आपल्याचकडे रहावी म्हणून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट यांनी दंड थोपटले आहेत. तर अजित पवारांनी आपले संपूर्ण लक्ष हे या निवडणुकीवर केंद्रीत केले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीला खिंडीत अडवण्यासाठी मनसेकडून प्रयत्न केले जाणार आहेत. तर सेनेनेही आपले दोन सेनापती पुण्यात उतरवले आहेत. त्यामुळे पुण्याची ही महापालिका निवडणूक गाजणार हे नक्की. वॉर्ड क्रमांक 20 (Ward No 20 Pune) मध्ये तर उत्सुकतेनं निवडणुकीची वाट पाहिली जातीये. या निवडणुकीत काय चमत्कार होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
2017 च्या महापालिका निवडणुकीत जिंकलेले उमेदवार
- (वॉर्ड 20 अ) गायकवाड प्रदीप मच्छिंद्र – नॅशनॅलिस्ट कॉंग्रेस पार्टी
- (वॉर्ड 20 ब) हाजी नदाफ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- (वॉर्ड 20 क) लताबाई दयाराम राजगुरु – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- (वॉर्ड 20 ड) अरविंद शिंदे- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वॉर्ड क्रमांक 20 अ
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी
|
भारतीय जनता पार्टी | | |
शिवसेना | | |
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | | |
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी | | |
महाराष्ट्र नवनिर्माण सेना | | |
अपक्ष | | |
वॉर्ड क्रमांक 20 ब
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी
|
भारतीय जनता पार्टी | | |
शिवसेना | | |
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | | |
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी | | |
महाराष्ट्र नवनिर्माण सेना | | |
अपक्ष | | |
वॉर्ड क्रमांक 20 क
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी
|
भारतीय जनता पार्टी | | |
शिवसेना | | |
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | | |
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी | | |
महाराष्ट्र नवनिर्माण सेना | | |
अपक्ष | | |
प्रभाग 20 लोकसंख्या
- एकूण लोकसंख्या 67129
- अनुसूचित जाती लोकसंख्या 19562
- अनुसूचित जमाती लोकसंख्या 1083
आरक्षण
- 20 अ अनुसूचित जाती महिला
- 20 ब सर्वसाधारण महिला
- 20 क सर्वसाधारण
प्रभाग क्र : 20 रास्तापेठ प्रभागातील महत्त्वाची ठिकाणं
- व्याप्ती : पुणे स्टेशन, ताडीवाला रोड, बंडगार्डन, लुंबिनी नगर, विनायक नगर, नाईक बेट, नारंगी बाग, आर. टी. ओ. पुणे, नायडू हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल, समाज कल्याण ऑफीस, जनरल पोस्ट ऑफीस पुणे, पुणे जिल्हा परिषद नवीन इमारत, एम.एस.ई.बी. ऑफीस, रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद विद्यालय, दुल्हा-दुल्हन कब्रस्थान, मालेवाडी, निशांत थिएटर, सेंट विन्सेंट स्कूल ग्राउंड, गुलाटी मेन्शन, विश्राम सोसायटी, गॅलक्सी सोसायटी, कोहिनूर टेरेस, रुबी हॉल, कुमार प्लॅटिनम, रोजरी स्कूल, दीपिका हौसिंग सोसायटी, आगरकर नगर, आयनॉक्स थिएटर, पुना क्लब ग्राउंड, सोहराब हॉल, वॉटर ट्रीटमेंट प्लॅट संगमवाडी, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, ताडीवाला रोड वसाहत, संगमवाडी पार्ट, पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालय, ओ. आय. एस. एस.एम.एस. कॉलेज ऑफ इंजिनीअरींग इ.
- उत्तर : मुठा नदी संगमाजवळ मुळा नदीस जेथे मिळते तेथून पूर्वेस मुळा मुठा नदीने बंडगार्डन पुलास मिळेपर्यंत.
- पूर्व : मुळा मुठा नदी बंडगार्डन पुलास जेथे मिळते तेथून दक्षिणेस कोरेगाव पार्क रस्त्याने बंडगार्डन रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिण पश्चिमेस बंडगार्डन रस्त्याने जहांगीर हॉस्पिटलच्या पश्चिमेकडील कॅनॉट रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने पुणे सोलापूर रेल्वे लाईनला मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस पुणे सोलापूर रेल्वे लाईनने पुणे कॅन्टोन्मेंट च्या हद्दीस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस पुणे कॅन्टोन्मेंट च्या हद्दीने पद्मजी रस्त्यास (तेज पारवाणी रस्त्यास) मिळेपर्यंत. (निशात सिनेमाच्या दक्षिणेकडील रस्ता)
- दक्षिण: पुणे कॅन्टोन्मेंटची हद्द पद्मजी रस्त्यास (तेज पारवाणी रस्त्यास) जेथे मिळते (निशात सिनेमाच्या दक्षिणेकडील रस्ता) तेथून पश्चिमेस पद्मजी रस्त्याने व पुढे वाघमारे गुरुजी रस्त्याने ए. डी. कॅम्प चौकात पं. जवाहरलाल नेहरू रस्त्यास मिळेपर्यंत.
- पश्चिम : वाघमारे गुरुजी रस्ता ए.डी. कॅम्प चौकात पं. जवाहरलाल नेहरू रस्त्यास जेथे मिळतो तेथून उत्तरेस पं. जवाहरलाल नेहरू रस्त्याने मुदलियार रस्त्यास (समर्थ पोलीस स्टेशनच्या दक्षिणेकडील रस्ता) राज गोपालाचारी चौकात मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस मुदलियार | रस्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याने पुणे मुंबई रेल्वे लाईनला मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस पुणे मुंबई रेल्वे लाईनने मुठा नदीस ” मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस मुठा नदीने मुळा नदीस संगमाजवळ मिळेपर्यंत.