टीआरपीसाठी शरद पवार यांनी राजीनामा दिला; देवेंद्र फडणवीस यांचा घणघात
Devendra Fadnavis on Sharad Pawar : शरद पवार यांचा राजीनामा अन् राष्ट्र्वादी पक्षावर देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, हा तर टीआरपीसाठीचा...
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांनी टीआरपीसाठी राजीनामा दिला, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. वज्रमूठ सभेवर टीका करताना ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या पुस्तकातील मजकूर देवेंद्र फडणवीस यांनी वाचूनही दाखवला. “मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देणार आणि मीच राजीनामा मागे घेणार. टीआरपी कसा मिळवायचा हे पवारांना माहिती आहे, असं म्हणत फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
पवारांवर हल्लाबोल
शरद पवार म्हणाले होते की 4-5 राज्यातच भाजपची सत्ता आहे. पण त्यांना हे माहिती नाहीयं देशातील 16 राज्यात आमचं सरकार आहे. आणि इतर ठिकाणी प्रमुख विरोधीपक्ष भाजपच आहे. विरोधी पक्षनेते आमचेच आहेत, असं म्हणत फडणवीसांनी टोला लगावला आहे.
सध्याच्या राजकारणात कुणी म्हणतं भाकरी फिरवली पाहिजे कोण म्हणतं भाकरी करपली आहे. पण आपला भाजप हा एकमेव पक्ष आहे. जो गरिबांच्या भाकरीचा विचार करतो. नाहीतर काहीचे लोक फक्त फक्त भाकरी फिरवण्याची गोष्ट करत आहेत, असं फडणवीस म्हणालेत.
“कर्नाटक पटर्न महाराष्ट्रात चालणार नाही”
मतांचं धृवीकरण कितीही करा. कितीही लांगूलचालन करा. कर्नाटक पटर्न महाराष्ट्रात चालणार नाही. इथे फक्त मोदींचा पटर्न चालणार. कर्नाटकमध्ये 700 पेक्षा कमी मतांनी पडलेले उमेदवार 5 आहेत आणि 2 ते तीन हजारांनी पडलेले 42 उमेदवार आहेत. राज्यात भाजप आणि सेनेची युती भक्कम आहे. आज फक्त शिल्लक सेना महाविकास आघाडीकडे आहे. येत्या निवडणुकीत महापालिका असो की लोकसभा की विधनासभा या निवडणुका युतीच जिंकणार, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
बुथ समक्ष असला तर सर्वजण जरी एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही. कर्नाटक निकालानंतर उड्या मारत आहेत. मात्र त्याचवेळी सर्वात जास्त राज्यातील सर्व महापालिका भाजपने जिंकल्या. यांचा कर्नाटक फॉर्म्युला लोकसभेत लक्षात येणार आहे. कर्नाटकमध्ये 28 पैकी 25 जागा निवडून येणार, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंनी 8 मागण्या सर्वोच्च न्यायालयात मांडल्या होत्या. मात्र एकही मागणी मान्य झाली नाहीये. तरी उद्धव ठाकरे म्हणतायत जा जा गावी कोर्टचा निर्णय सांगा…, असं म्हणत फडणवीसांनी टोला लगावला आहे.
कार्यकर्त्यांना आवाहन
एका वर्षाचं समर्पण हे मोदींच्या कार्यासाठी, देशासाठी असणार आहे. पुढच्या एका वर्षात कुणाला काहीही मिळणार नाही. कुणी समिती मागायची नाही. कुणी मंत्रिपद मागायचं नाही, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय.
शिंदे-फडणवीस सरकार कार्यकाळ पूर्ण करेन आणि पुढे सुद्धा निवडून येईल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय.