संजय राऊत राजाराम राऊतांचा मुलगा असेल तर त्यांनी त्र्यंबकेश्वरला जाऊन दाखवावं!; नितेश राणे यांची जहरी टीका
Nitesh Rane on Sanjay Raut : त्र्यंबकेश्वरला जाऊन दाखवावं, दोन पायांनी परत येणार नाही!; नितेश राणे यांचं संजय राऊतांना चॅलेंज
पुणे : भाजपचे नेते नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे. “संजय राऊत हे खरंच राजाराम राऊतांचा मुलगा असेल तर त्यांनी आता त्र्यंबकेश्वरला जाऊन दाखवावं”, असं चॅलेंज नितेश राणे यांनी दिलं आहे. संजय राऊतचा लव्ह जिहाद झाला आहे. त्याचं शुद्धीकरण करणं अजून बाकी आहे. संजय राऊत दोन पायांनी परत येणार नाही, असंही नितेश म्हणालेत.
उद्धव ठाकरेंना आनंद काँग्रेस जिंकल्याचा आहे की पाकिस्तान? भाजप जिंकलं की भारत माता की जय बोलतात. काँग्रेस जिंकलं की पाकिस्तान जिंदाबाद बोलतात हा फरक आहे, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
संजय राऊतला मी सांगतो की त्यांनं त्र्यंबकेश्वरला यावं. इकडं जे बोलतात तेच वाक्य तिकडं बोल आणि दोन पायांनी परत येऊन दाखव, असं चॅलेजं नितेश राणेंनी दिलंय.
उरूस जातो. धूप दाखवतात पण आत जाण्याचा हट्ट करत नाहीत. तिथल्या मुसलमानांचा आग्रह होता की चादर टाकायची. जिहादी आहेत. बोलायला फाटल्यावर कोणी स्वत:ला शिवभक्त म्हणेल. आज त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये घुसले. उद्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये घुसतील. हे आम्ही चालू देणार नाही. अशा गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
मातोश्रीमध्ये काम केलेला कामगार पडला. गुरुनानक हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे. सिरियस आहे. पोलिसांनी चौकशी करावी. मातोश्रीमध्ये लोकांना ढकलण्याची सवय आहे. त्यामुळे पडले का ढकलले चौकशी करा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांची आजची पत्रकार परिषद पहिली. त्यांचा चेहरा आवळलेला दिसतोय. ही सगळी जेलमध्ये जायची चिन्हे आहेत. संजय राऊतांची खासदारकी पण जाणार आणि जेल वारी पण होणार, असंही त्यांनी म्हटलं आहे.
डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणावरही नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या चौकशी झाल्यानंतर बोललं पाहिजे, असं नितेश राणे म्हणालेत.