पुणे येथील मोतीबागेत शरद पवार यांच्यासोबत कोण? पवारांसोबत दिसला फक्त हा नेता
Ajit Pawar With Shiv Sena : राज्यात वर्षभरानंतर पुन्हा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना आणि भाजपच्या युतीत अजित पवार यांचा गट आला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत इतरांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
प्रदीप कापसे, पुणे : शिंदे सरकारला ३० जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर वर्षभरात शिवसेना-भाजप सोबत आणखी एक नवीन पक्ष आला. अजित पवार यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून सरकारमध्ये सहभागी झाला. रविवारी २ जुलै रोजी राजभवनात शपथविधी समारंभ सुरु होता. त्यावेळी पुणे येथील मोती बागेत शरद पवार यांच्यांसोबत फक्त रोहित पवार होते. शरद पवार यांच्या जवळचे म्हटले जाणारे अनेक नेते त्यावेळी राजभवनात होते. दिल्लीत शरद पवार यांच्यासोबत सावलीसारखे राहणारे प्रफुल्ल पटेलसुद्धा राजभवनात होते.
शरद पवार यांच्या कार्यालयाबाहेर बंदोबस्त
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर शरद पवार यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. शरद पवार यांच्या पुणे कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला. रविवारी दुपारी मुंबईत अजित पवार यांचा शपथविधी सुरु असताना पुणे कार्यालयात शरद पवार अन् रोहित पवार यांच्यांत चर्चा होत होती.
कधी ठरली रणनिती
अजित पवार नुकतेच दोन वेळा दिल्ली दौरा करुन आले होते. 29 जूनला दिल्लीत एकनाथ शिंदे दिल्लीत गेले होते. त्यावेळी अमित शाह यांच्यांसोबत बैठक झाली. त्याच बैठकीत सर्वकाही निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भुजबळांसोबत समता परिषद
अजित पवार यांच्यासोबत शरद पवार यांचे अनेक विश्वासू नेते आले आहेत. त्यात छगन भुजबळ यांचाही समावेश आहे. छगन भुजबळांसोबत राज्यभरातील समता परिषदेचे पदाधिकारी देखील राजभवनात आले. समता परिषदेचे दिलीप खैरे सगळ्या पदाधिकार्यांना घेऊन राजभवनात दाखल झाले. यामुळे राज्यातील समता परिषदेने देखील राष्ट्रवादीला रामराम ठोकल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसचा भाजपशी काही संबंध नाही
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीशी काँग्रेसचा काहीच संबंध नाही. काँग्रेसची भूमिका आम्ही लवकरच जाहीर करू, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. आजच्या घटनेशी काँग्रेसचा काही संबंध नाही, तो त्यांचा प्रश्न आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.