पुण्यातील युवासेनेचा उपनेता मनसेमध्ये, राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

पुण्यातील युवासेनेचे उपनेते संग्राम माळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला

पुण्यातील युवासेनेचा उपनेता मनसेमध्ये, राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 2:46 PM

मुंबई : पुण्यातील युवासेनेच्या उपनेत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती धरला आहे. युवासेना उपनेते संग्राम माळी यांनी शिवसेनेला रामराम ठोकत मनसेमध्ये प्रवेश केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. (Pune Yuvasena Leader Sangram Mali leaves Shivsena to join MNS)

गेल्या काही दिवसांपासून मनसेमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची संख्या वाढत आहे. पुण्यातील युवासेनेचे उपनेते संग्राम माळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘कृष्णकुंज’ बंगल्यावर संग्राम माळी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

पालक संघ आणि कोचिंग क्लासेस मालक – शिक्षकांच्या शिष्टमंडळाने आज राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर ही भेट झाली. यावेळी राज ठाकरे यांनी कोचिंग क्लास चालक आणि पालकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर थेट पालकांसमोरच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना फोन लावून अकरावी प्रवेशाची समस्या मांडली.

मनसेप्रवेशाचा ओघ सुरुच

ऑक्टोबर महिन्यात शहापूर तालुक्यातही शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचे पाहायला मिळाले. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश झाला.

दोन महिन्यांपूर्वी कल्याण-डोंबिवली भागातील शिवसेना आणि भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला. माजी आमदार प्रकाश भोईर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख वैभव किणी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. शिवसेना भाजपला ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भगदाड पडल्याची चर्चा आहे.

त्याआधी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाट धरली होती. वरळीतील एनजीओ, सार्वजनिक मंडळे यांचे कार्यकर्ते आणि काही सामान्य नागरिकांनी मनसेत प्रवेश केला होता.

औरंगाबादेतील निष्ठावान शिवसैनिक मनसेत

औरंगाबाद, मुंबई, पुणे अशा विविध भागात कार्यकर्ते-पदाधिकारी यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला होता. तर फेब्रुवारी महिन्यात चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू शिवसैनिक सुहास दशरथे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. पाठोपाठ खैरे यांच्या सात निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षप्रवेश केला होता. (Pune Yuvasena Leader Sangram Mali leaves Shivsena to join MNS)

संबंधित बातम्या :

शहापूरमध्ये शिवसेनेला खिंडार, अविनाश जाधवांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिक मनसेत

कल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांच्या हाती मनसेचा झेंडा

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांचा मनसेप्रवेश

चंद्रकांत खैरे यांना धक्का, औरंगाबादेतील सात निष्ठावंत शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश

(Pune Yuvasena Leader Sangram Mali leaves Shivsena to join MNS)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.