उपमुख्यमंत्रीच छुपे मुख्यमंत्री? शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांचा सवाल, म्हणाल्या ‘हे तर स्कूटर सरकार’

देवेंद्र फडणवीस हेच छुपे मुख्यमंत्री आहेत की काय? असा बोचरा सवाल मनिषा कायंदे यांनी उपस्थित केलाय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी वेगवेगळी वॉररुम का? या दोघांचीही एकमेकांमध्ये स्पर्धा सुरु आहे का? असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.

उपमुख्यमंत्रीच छुपे मुख्यमंत्री? शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांचा सवाल, म्हणाल्या 'हे तर स्कूटर सरकार'
मनिषा कायंदे, शिवसेना नेत्याImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 6:33 AM

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच छुपे मुख्यमंत्री आहेत का? असा सवाल शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी केला आहे. मंत्रालयातील (Mantralaya) वॉर रुमच्या मुद्द्यावरुन त्यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकावर टीका केली. मंत्रलयामध्ये दोन वॉररुम स्थापन करण्यात आले आहेत. दोन वॉररुम स्थापन करुन शिंदे-फडणवीस एकमेकांमध्येच स्पर्धा करु पाहत आहेत का, अशी शंकादेखील मनिषा कायंदे यांनी व्यक्त केलीय.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात जेव्हा होतं, त्यावेळी विरोधक असलेल्या भाजपने या सरकारला तीन चाकांचं रिक्षा सरकार म्हणून हिणवलं. पण आता राज्यात दोन चाकाचं स्कूटर सरकार आल्याचं म्हणत मनिषा कायंदे यांनी खोचक टोला लगावला आहे. 13 सप्टेंबर रोजी ट्वीटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे.

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीस हेच छुपे मुख्यमंत्री आहेत की काय? असा बोचरा सवाल या व्हिडीओच्या माध्यमातून मनिषा कायंदे यांनी उपस्थित केलाय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी वेगवेगळी वॉररुम का? या दोघांचीही एकमेकांमध्ये स्पर्धा सुरु आहे का? असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.

पाहा LIVE घडामोडी : Video

शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केलेल्या टीकेला शिंदे गट आणि भाजपकडून काय प्रत्तुत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार, अशी घोषणा जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली होती, तेव्हा राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपण सरकारमध्ये नसू, असंही म्हटलं होतं.

पण विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना दिसले होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र चकीत झाला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधील कारभारावरुन शिवसेनेकडून टीका केली जाते आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.