आबांच्या मुलापाठोपाठ पत्नी-आमदार सुमन पाटीलही कोरोना पॉझिटिव्ह
आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील या राष्ट्रवादीकडून तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत.
सांगली : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आर. आर. आबा यांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्यापाठोपाठ आबांची पत्नी अर्थात राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटीलही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. (R R Patil Wife NCP MLA Suman Patil Corona Positive)
आबांच्या पत्नी सुमन पाटील या राष्ट्रवादीकडून तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. त्यांचे पुत्र रोहित पाटील आणि दीर सुरेश पाटील या दोघांचे कोरोना अहवाल गुरुवारी दुपारी पॉझिटिव्ह आले होते. त्यावेळी सुमनताई पाटील यांची स्वॅब तपासणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र काल (शनिवारी) रात्री उशिरा आलेल्या त्यांच्या अहवालात कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
रोहित पाटील आणि सुरेश पाटील या दोघांनाही उपचारासाठी सुरुवातीला सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी तिघांनाही उपचारासाठी पुण्याला नेण्यात आले आहे. आमदार सुमन पाटील यांच्यासह तिघांचीही प्रकृती ठीक असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.
आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने सुमन पाटील यांना तिकीट दिले होते. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली आणि त्या पुन्हा आमदारपदी निवडून आल्या.
VIDEO : महाफास्ट न्यूज 100 | 6 September 2020 https://t.co/k0UPtwjCUH
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 6, 2020
दरम्यान, सांगली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. सांगली जिल्ह्यात काल दिवसभरात कोरोनामुळे तब्बल 36 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एका दिवसात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा जिल्ह्यातील हा सर्वाधिक आकडा आहे. सांगली जिल्ह्यात कोरोनाने एकूण 633 बळी गेले. (R R Patil Wife NCP MLA Suman Patil Corona Positive)
सांगली जिल्ह्यात उपचार सुरु असलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण – 6927
सांगली जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेले रुग्ण – 8702
सांगली जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण मृत्यू – 633
उपचार सुरु असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी चिंताजनक – 751
सांगली महापालिका क्षेत्रात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 8066
सांगली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण -16 हजार 262
संबंधित बातम्या :
आबांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, पुत्र रोहित पाटील यांच्यासह दोघे बाधित
‘मी कोव्हिड पॉझिटिव्ह, लवकरच आपल्या सेवेत हजर राहीन’, सदाभाऊ खोत यांना कोरोना संसर्ग
रोहित पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड करा, कार्यकर्त्यांचं शरद पवारांना पत्र
(R R Patil Wife NCP MLA Suman Patil Corona Positive)