लाचार काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं, राधाकृष्ण विखे पाटलांचा हल्लाबोल

भाजप नते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं विधान दुटप्पीपणाचं असल्याची टीका केली आहे (Radhakrishna Vikhe patil on Rahul Gandhi) .

लाचार काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं, राधाकृष्ण विखे पाटलांचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: May 27, 2020 | 3:43 PM

अहमदनगर : “काँग्रेस सत्तेसाठी लाचार झाली आहे. सरकारमध्ये असूनही निर्णय घेण्याचा अधिकार (Radhakrishna Vikhe patil on Rahul Gandhi) नसेल तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडायची हिंमत दाखवावी”, असा हल्लाबोल भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. याशिवाय त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं विधान दुटप्पीपणाचं असल्याची टीका केली (Radhakrishna Vikhe patil on Rahul Gandhi) .

राहुल गांधी यांनी काल (26 मे) पत्रकार परिषदेत महाराष्ट्र सरकारबाबत केलेल्या विधानामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. “आम्ही महाराष्ट्रात सरकारला पाठिंबा दिला आहे पण आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही”, असं विधान राहुल गांधी यांनी केलं. त्यानंतर त्यांनी आज (27 मे) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर बातचीत केली. यावेळी “कोरोना लढाईमध्ये आम्ही आपल्यासोबत आहोत. राज्यात कोरोना कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न करु”, असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींच्या या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे. “राहुल गांधींचं विधान दुटप्पीपणाचं आहे. एकीकडे सरकारमध्ये राहायचं आणि दुसरीकडे सांगायचं आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही मग तुम्ही सरकारमध्ये कशाला थांबलात?”, असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

“काँग्रेस सत्तेसाठी लाचार झाली आहे. तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही तर सत्तेतून बाहेर पडायची हिंमत दाखवा. काँग्रेसची अवस्था डबलढोलकी सारखी झाली आहे”, असा घणाघात राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

“अहमदनगरमध्ये कोरोनाचा प्रादुभाव वाढत असताना काँग्रेसचे मंत्री मुंबईत जावून का थांबले आहेत? राज्यातील जनता हवालदिल झाली असताना मंत्री गायब आहेत. राज्याच्या या अवस्थेला शिवसेना, राष्ट्रवादीसह काँग्रेसही तेवढीच जबाबदार आहे”, अशीदेखील टीका विखे पाटील यांनी केली.

राहुल गांधी काल नेमकं काय म्हणाले होते?

“महाराष्ट्र सरकारला आमचा पाठिंबा आहे (Rahul Gandhi on Maharashtra Government). मात्र, आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाहीत. आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये मुख्य निर्णयकर्ते आहोत. सरकार चालवणं आणि सरकारला पाठिंबा देणं हा यातला फरक आहे”, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रात आमचा सरकारला पाठिंबा, मात्र आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही : राहुल गांधी

नारायण राणे अस्वस्थ, तापलेल्या वातावरणात सत्तेची पोळी भाजण्याचा प्रयत्न : बाळासाहेब थोरात

फडणवीसांनी आता ‘या’ दोन आकडेवाऱ्या द्याव्यात, पृथ्वीराज चव्हाणांचे आवाहन

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.