राजीनाम्याचा पुनर्विचार करा, शरद पवार यांची मनधरणी; राहुल गांधी आणि स्टॅलिन यांचा सुप्रिया सुळे यांना फोन

राष्ट्रवादीचा आगामी राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून सर्वच स्तरातून मनधरणी होत आहे. राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनीही ही मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे.

राजीनाम्याचा पुनर्विचार करा, शरद पवार यांची मनधरणी; राहुल गांधी आणि स्टॅलिन यांचा सुप्रिया सुळे यांना फोन
sharad pawar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 9:35 AM

विनायक डावरुंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीतच नव्हे तर महाविकास आघाडीतही पवारांच्या या निर्णयाने खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीचं कसं होणार? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे. तर राष्ट्रीय पातळीवर विरोधकांच्या ऐक्याचं काय होणार? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्याची दखल राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनीही घेतली आहे. या नेत्यांनी पवार यांची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना फोन केला आहे. या दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांनी राजीनामा का दिला? याची माहिती सुप्रिया सुळेंकडून घेतली आहे. तसेच पवार यांनी राजीनाम्याचा पुनर्विचार करावा, अशी विनंती या नेत्यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे केल्याचं समजतं. तर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राष्ट्रवादीचे नेते पीसी चाको यांना फोन करून पवार यांच्या राजीनाम्याचं कारण समजून घेतल्याचं वृत्त आहे. या सर्वच नेत्यांनी पवार यांची मनधरणी करण्यास सुरुवात केल्याने शरद पवार राजीनामा मागे घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उद्या फैसला

शरद पवार पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेणार की नाही? याचा निर्णय उद्या होणार आहे. उद्या राष्ट्रवादीच्या समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत पवार यांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार आहे. शरद पवार राजीनामा मागे घेत नसतील तर सुप्रिया सुळे यांच्याकडे अध्यक्षपद देण्याचं राष्ट्रवादीत घटत आहे. सुप्रिया सुळे यांनी देश सांभाळावा आणि अजित पवार यांनी महाराष्ट्र सांभाळावा, असा फॉर्म्युलाही समोर येत आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वाटत होती. पण ही शक्यता मावळली आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिल्लीत ताई आणि राज्यात दादा हा फॉर्म्युला सूचवला होता. प्रफुल्ल पटेल यांनी मात्र हा फॉर्म्युला फेटाळून लावला आहे. ते भुजबळ यांचं वैयक्तिक मत असल्याचं ते म्हणाले होते. त्यातच शरद पवार यांनी समितीचा निर्णय आपल्याला मान्य असेल असं म्हटलं आहे.

त्यामुळे या संपूर्ण राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या बैठकीत कोणतीही चर्चा होणार नाही. शरद पवार हेच अध्यक्ष राहतील असा ठराव उद्याच्या बैठकीत करून तो पवारांना कळवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष राहतील असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे उद्याच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.