AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत राहुल गांधींचा गुजरातमध्ये मोठा दावा, म्हणाले, भाजपाने…

गुजरातमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा उल्लेख केला आहे. भाजपाने ही निवडणूक कटकारस्थान करून जिंकली असा दावा राहुल गांधी यांनी केलाय.

महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत राहुल गांधींचा गुजरातमध्ये मोठा दावा, म्हणाले, भाजपाने...
rahul gandhi
Follow us
| Updated on: Apr 09, 2025 | 5:49 PM

Rahul Gandhi : काँग्रेसचे 84 वे अधिवेशन गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे पार पडले. या अधिवेशनात काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि आरएसएसवर सडकून टीका केली. तसेच आम्ही जातीआधारित जनगणना करण्याची मागणी केली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती मान्य केली नाही. आम्ही सत्तेत आलो की जातीआधारित जनगणेचा कायदा मंजूर करू, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच या भाषणात बोलताना त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचाही उल्लेख केला. कटकारस्थान करून भाजपाने महाराष्ट्रातील निवडणूक जिंकली, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

महाराष्ट्रातील मतदारांची यादी दिली जात नाहीये- राहुल गांधी

“देश आता कंटाळला आहे. तुम्ही बघा बिहारच्या निवडणुकीत काय होतं तर. भाजपाने महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक कशा पद्धतीने जिंकली हे तुम्ही तिथे जाऊन लोकांना विचारा. आम्ही निवडणूक आयोगाला महाराष्ट्राच्या मतदारांची यादी विचारत आहोत. ही यादी मागून आम्ही थकलो आहोत. पण अजूनही निवडणूक आयोग आम्हाला महाराष्ट्रातील मतदारांची यादी देत नाहीये,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच येणाऱ्या काळात देशात बदल घडणार आहे. लोकांचे मत बदलत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

देशाचा एक्सरे झाला पाहिजे- राहुल गांधी

“मला फक्त माझ्या कामात रस आहे. लोक काय म्हणतात, याने मला काहीही फरक पडत नाही. तेलंगाणात आम्ही क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. तेथे आम्ही जातीजनगणना कर आहोत. काही महिन्यांपूर्वी मी संसदेत एक भाषण केले होते. केंद्र सरकारने जातीजनगणना करावी, अशी मी मोदींकडे मागणी केली होती. या देशात दलित किती आहेत? मागस किती आहेत? मुस्लीम किती आहेत? आदिवासी किती आहेत? हे समजलं पाहिजे असं मी म्हणालो होतो. देशाचा एक्सरे झाला पाहिजे, अशी मागणी मी केली होती. पण मोदीजी, आरएसएसने आम्ही जाती जनगणना करणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

भाजपाला कोणाची किती भागिदारी, हे लपवायचंय- राहुल गांधी

“या देशात दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याकांना किती भागिदारी मिळते हे त्यांना लपवायचं आहे. लोकसभा, राज्यसभेत आम्ही जातीजनगणेबाबत कायदा मंजूर करू, असं म्ही म्हणालो होतो. तेलंगणात आम्ही हा कायदा आणला आहे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.