“माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेला आदित्य ठाकरेंचीच फूस”, राहुल शेवाळे यांचा गंभीर आरोप

आरोपांनंतर राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली...

माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेला आदित्य ठाकरेंचीच फूस, राहुल शेवाळे यांचा गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Dec 25, 2022 | 2:23 PM

मुंबई : “माझं राजकीय आणि वैयक्तिक आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्या महिलेने माझ्यावर आरोप केलेत, ती महिला पाकिस्तानी एजंटच्या मदतीने माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहे. या महिलेला युवासेनेचा पाठिंबा आहे. विशेष करून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचीच या महिलेला फूस आहे”, असा गंभीर आरोप शिंदेगटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केला आहे.

माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्या महिलेवर दबाव टाकला, असंही शेवाळे म्हणालेत.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर शोषणाचे आरोप ठेवण्यात आले आहेत. एका फॅशन डिझायनरचं आरोप ठाकरे गटाने शेवाळेंवर आरोप केले आहेत. या प्रकरणाचे विधिमंडळ अधिवेशनातही पडसाद उमटले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. या प्रकरणावर शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे.

जी महिला माझ्यावर आरोप करतेय तिचं सोशल मीडिया अकाऊंट पाहिलं असता तिला अनेक शिवसेनेचे युवा नेते फॉलो करतात. त्यामुळे तिला ठाकरेगटाचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट होतं. मलं फसवण्याचा डाव आहे, असं शेवाळे म्हणालेत.

राष्ट्रवादीचाही या सगळ्या प्रकरणात हात आहे, असं म्हणत शेवाळे यांनी आपल्यावर होणारे आरोप फेटाळून लावलेत.

फेक अकाऊंटच्या माध्यमातून महिलेने मला ब्लॅकमेल केलं. या महिलेची पार्श्वभूमी पाहता ती महिला गुन्हेगारी पार्श्वभूमीची असल्याचं लक्षात येतं. तिच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, असं शेवाळे म्हणालेत.

माझ्यावर आरोप करणारी महिला दोन वेळा कराचीला जाऊन आली आहे. या महिलेची दाऊद आणि पाकिस्तानशी लिंक आहे. पाकिस्तानी एजंटच्या मदतीने तिने फेक अकाऊंट सुरू केलं होतं. या महिलेची पार्श्वभूमी गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे, असं शेवाळे म्हणालेत.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....