आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात राज ठाकरेंचे फेरबदल, माजी नगरसेवकाला हटवून नवे नेतृत्व

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळी विधानसभेची धुरा संजय जामदार यांच्या खांद्यावर दिली आहे. संजय जामदार यांनी पक्षातर्फे यापूर्वी वरळी विधानसभा निवडणूक लढवली होती

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात राज ठाकरेंचे फेरबदल, माजी नगरसेवकाला हटवून नवे नेतृत्व
राज ठाकरेंसह मनसे उपाध्यक्ष संजय जमादार
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 3:24 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षात संघटनात्मक बदल केले आहेत. माजी नगरसेवक संतोष धुरी (Santosh Dhuri) यांना वरळी विभाग अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे. मनसे उपाध्यक्ष संजय जामदार (Sanjay Jamadar) यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या (BMC Election 2022) दृष्टीने मनसे आक्रमक होताना दिसत आहे.

पर्यटन मंत्री आणि शिवसेना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आमदार असलेल्या वरळी (Worli) विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महत्त्वाचे बदल केले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळी विधानसभेची धुरा संजय जामदार यांच्या खांद्यावर दिली आहे. संजय जामदार यांनी पक्षातर्फे यापूर्वी वरळी विधानसभा निवडणूक लढवली होती. तर फेरबदल केल्यानंतर माजी नगरसेवक संतोष धुरी यांना वरळी विभाग अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे.

कोण आहेत संजय जामदार?

संजय जामदार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष आहेत वरळी विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी निवडणूक लढवली होती मनसेच्या वीज बिल आंदोलनावेळी हिरीरीने सहभाग

संजय जामदार यांची इन्स्टाग्राम पोस्ट

आदित्य ठाकरेंविरोधात मनसे उमेदवार नव्हता

आदित्य ठाकरे 2019 मध्ये वरळी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तिथे आघाडीतर्फे राष्ट्रवादीने उमेदवार दिला होता, मात्र मनसेने ठाकरेंच्या विरोधात उमेदवार उभा केलेला नव्हता. याविषयी निवडणूक काळातच राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ‘हे एक चांगलं कृत्य (जेश्चर) आहे. तो निवडणूक लढवत असेल, तर त्याच्याविरोधात उमेदवार देता कामा नये, असं मला वाटतं, त्यांना काय वाटतं, हा वेगळा मुद्दा आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

आदित्य निवडणूक लढण्यात गैर काय? अमितलाही रोखणार नाही : राज ठाकरे

शिवाजी पार्क प्रकल्पाच्या निविदा रोखण्यासाठी राज ठाकरेंचं पत्र; तर आदित्य ठाकरे म्हणतात, घाई करा

(Raj Thackeray appoints MNS Vice President Sanjay Jamadar as Worli Chief in Aditya Thackeray Vidhansabha Constituency)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.