‘घमेंडी’च्या विरोधात मतदारांची ‘मुसंडी’ : राज ठाकरे
मुंबई : गेल्या चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी जे काही चालवलं होतं, त्याची जागा मतदारांनी दाखवली, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. पाच राज्यांचे निकाल लागत असताना, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका मांडली. ‘घमेंडी’च्या विरोधात लोकांनी मारलेली ‘मुसंडी’. #AssemblyElectionResults2018 #AssemblyElections2018 — Raj Thackeray (@RajThackeray) […]
मुंबई : गेल्या चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी जे काही चालवलं होतं, त्याची जागा मतदारांनी दाखवली, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. पाच राज्यांचे निकाल लागत असताना, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका मांडली.
‘घमेंडी’च्या विरोधात लोकांनी मारलेली ‘मुसंडी’. #AssemblyElectionResults2018 #AssemblyElections2018
— Raj Thackeray (@RajThackeray) December 11, 2018
गुजरात निवडणुकीत राहुल गांधी एकटेच होते, त्या निवडणुकीत भाजपच्या 165 जागा यायला हव्या होत्या, मात्र 99 आल्या, काँग्रेसच्या जागा 60 वरुन 81 झाल्या, याची आठवण राज ठाकरेंनी करुन दिली आणि मोदी लाट ओसरल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. मतदारांचे अभिनंदन करतानाही राज ठाकरेंनी मोदींना टोमणा मारला, ते म्हणाले, “सर्व मतदारांचं अभिनंदन, मात्र सर्वात आधी गुजरातचं अभिनंदन, नरेंद्र मोदींना सर्वात आधी गुजरातने जागा दाखवली.”
या देशाला राम मंदिराची नव्हे तर राम राज्याची गरज असून, या देशातील जनता भाजपला मतदान करताना आता विचार करेल, असेही राज ठाकरे म्हणाले. हे सांगत असताना राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील कृषी मंत्रालयाचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, “महाराष्ट्रात दुष्काळ आवासून उभा, पांडुरंग फुंडकरांच्या निधनानंतर राज्याला कृषीमंत्रीच नाही, चंद्रकांत पाटलांकडे अतिरिक्त भार दिलाय”. राज्याला पूर्णवेळ कृषीमंत्री नसल्याबाबत राज ठाकरेंनी तीव्र शब्दात खंत व्यक्त केली.
दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यावरुनही इशारा दिला. ते म्हणाले, “गव्हर्नर उर्जित पटेल यांनी दिलेला राजीनामा म्हणजे धोक्याची घंटा, पुढे मोठा धोका असेल.”
राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे –
- गुजरात निवडणुकीत राहुल गांधी एकटेच होते, त्या निवडणुकीत भाजपच्या 165 जागा यायला हव्या होत्या 99 आल्या, काँग्रेसच्या जागा 60 वरुन 81 झाल्या- राज ठाकरे
- या देशाला राम मंदिराची नव्हे तर राम राज्याची गरज, या देशातील जनता भाजपला मतदान करताना आता विचार करेल – राज ठाकरे
- महाराष्ट्रात दुष्काळ आवासून उभा, पांडुरंग फुंडकरांच्या निधनानंतर राज्याला कृषीमंत्रीच नाही, चंद्रकांत पाटलांकडे अतिरिक्त भार दिलाय – राज ठाकरे
- गव्हर्नर उर्जित पटेल यांनी दिलेला राजीनामा म्हणजे धोक्याची घंटा, पुढे मोठा धोका असेल – राज ठाकरे
- गेल्या चार वर्षात मोदी-अमित शाहांनी जे काही चालवलं होतं, त्याची जागा मतदारांनी दाखवली – राज ठाकरे
- सर्व मतदारांचं अभिनंदन, मात्र सर्वात आधी गुजरातचं अभिनंदन, नरेंद्र मोदींना सर्वात आधी गुजरातने जागा दाखवली