Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांनी पिंपरीत खूप मोठं काम केलं, पण नशिबी काय आलं, तर पराभव – राज ठाकरे

अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये खूप मोठं काम केलं पण नशिबी पराभवच आला, अशा शब्दात राज यांनी सध्या फक्त विकासकामांवर निवडणूक जिंकता येत नसल्याचं मत व्यक्त केलं.

अजित पवारांनी पिंपरीत खूप मोठं काम केलं, पण नशिबी काय आलं, तर पराभव - राज ठाकरे
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 6:41 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसत्ता या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर महत्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यावेळी नाशिक महापालिका निवडणुकीतील पराभवाबाबत बोलताना राज यांनी एक खंतही बोलून दाखवली. इतकंच नाही तर अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये खूप मोठं काम केलं पण नशिबी पराभवच आला, अशा शब्दात राज यांनी सध्या फक्त विकासकामांवर निवडणूक जिंकता येत नसल्याचं मत व्यक्त केलं. जो लाट निर्माण करण्यात यशस्वी होतो तो जिंकतो, अशी परिस्थिती आजच्या निवडणुकांबाबत झाल्याचंही राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray on Ajit Pawar and mahapalika Elections)

नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आल्यानंतर आम्ही खूप काम केलं. 5 वर्षाच्या काळात भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. नाशिकचा पाण्याचा प्रश्न आम्ही कायमचा मिटवला. नाशिकमधील रस्ते आम्ही चांगले केले. पावसाळ्यात मुंबई, पुण्यातील रस्त्यांवर मोठाले खड्डे पडले पण नाशिकमध्ये पत्रकारांना खड्डे मिळाले नाहीत. मुंबई, पुण्यात गेली इतकी वर्षे ज्या लोकांना, उद्योगपतींना सत्ताधाऱ्यांना आणणं झालं नाही. अशा लोकांना मी नाशिकमध्ये आणलं. त्यांच्यामार्फत विकासकामं केली. हे चांगलं आहे की वाईट? लोकांनी साथ दिली तर हुरुप येतो. लोकांना नेमकं काय हवं आहे? इतरांसाखरंच वागायचं का?, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारलाय.

‘भ्रष्टाचाऱ्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत सुधारणा होणार नाही’

अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये खूप चांगलं काम केलं. पण त्यांच्या नशिबी शेवटी पराभवच आला. समाजाने काम केलं तर शाबासकी द्यावी, काम करत नसेल त्याला बाजूला करावं. चांगलं काम केलं तर शाबासकी आणि भ्रष्टाचार केला तर शिक्षा होत नाही तोपर्यंत सुधारणा होणार नाही. कायद्याची भीती नसेल तर गुन्हेगारी वाढणार. तसंच राजकारणात काहीही काम न करता निवडणुकीवेळी पैसे वाटायचे आणि मतं मिळवायची अशावेळी लोकांनी त्याला मतपेटीतून शिक्षा दिली नाही तोपर्यंत काही होणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले. हे सांगताना आपण आशावादी असल्याचं सांगायलाही राज ठाकरे विसरले नाहीत.

‘मोदींमुळे भाजप तर बाळासाहेबांमुळे शिवसेना सत्तेत’

मनसे आहे म्हणून राज ठाकरे आहे. माझं तोंड आणि माझ्या सहकार्यांचं काम आहे. पक्ष म्हणून नेता ओळखला जातो. एक राजकीय पक्षाचा नेता म्हणून बघितलं जातं. भारतात निवडणुका प्रतिकांवर होत असतात. लोकांनी मोदींना पाहून मतदान केलं. तर बाळासाहेबांना पाहून सत्ता दिली, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. देशात जो लाट निर्माण करतो तो जिंकतो. तसंच झालं. सध्या कोरोनाच्या लाटेवर सगळे स्वार आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा, अनिल देशमुखांची तात्काळ उच्चस्तरिय चौकशी करा : राज ठाकरे कडाडले

आधी वीज बिल माफ करु म्हणाले, अदानी शरद पवारांच्या घरी येऊन गेल्यावर नाही म्हणाले : राज ठाकरे

Raj Thackeray on Ajit Pawar and mahapalika Elections

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.