Raj Thackeray : राज ठाकरे यांनी ‘सागर’वर जाऊन घेतली फडणवीसांची भेट, तासभर खलबतं; चर्चा मात्र गुलदस्त्यात

Raj Thackeray : येत्या 5 सप्टेंबर रोजी भाजचे नेते अमित शाह मुंबईत येत आहेत. त्यानंतरच्या आठवड्यात भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डाही मुंबईत येणार आहेत. हे दोन्ही नेते महापालिका निवडणुकीवर चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी 'सागर'वर जाऊन घेतली फडणवीसांची भेट, तासभर खलबतं; चर्चा मात्र गुलदस्त्यात
राज ठाकरे यांनी सागरवर जाऊन घेतली फडणवीसांची भेट, तासभर खलबतं; चर्चा मात्र गुलदस्त्यातImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 12:42 PM

मुंबई: राज्यातील सत्ता संघर्ष टिपेला पोहोचलेला असतानाच आणि महापालिका निवडणुका (bmc) तोंडावर आलेल्या असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. गणेशोत्सव येत आहे. राज ठाकरे यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानी पहिल्यांदाच गणपती बसणार आहेत. त्यामुळे गणपती दर्शनासाठी सहकुटुंब यावं म्हणून फडणवीस यांना आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) सागरवर आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. मात्र, तासभर काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहेत. मात्र, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अचानक झालेल्या या भेटीमुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राज ठाकरे आज सकाळी 8 वाजता सागर बंगल्यावर आले होते. त्याची गंधवार्ता कुणालाही नव्हती. राज ठाकरे यांनी अचानक ही भेट घेऊन सर्वांनाच बुचकळ्यात पाडलं आहे. गणपती दर्शनाला घरी येण्याचं आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे फडणवीसांच्या निवासस्थानी आल्याचं सांगितलं जातं. पण या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यावेळी राज्याची राजकीय परिस्थिती आणि मुंबई-ठाण्यासह राज्यातील इतर महापालिका निवडणुकीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

शाहा मुंबईत येण्यापूर्वीच राज-फडणवीस भेट

दरम्यान, येत्या 5 सप्टेंबर रोजी भाजचे नेते अमित शाह मुंबईत येत आहेत. त्यानंतरच्या आठवड्यात भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डाही मुंबईत येणार आहेत. हे दोन्ही नेते महापालिका निवडणुकीवर चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. शाहा मुंबईत येण्यापूर्वीच राज ठाकरे आणि फडणवीस यांची भेट झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

हे सुद्धा वाचा

मेळाव्यानंतर पहिली भेट

दरम्यान, गेल्या आठवड्यात मनसेचा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला होता. मात्र, भाजपवर एका शब्दानेही टीका केली नव्हती. उलट मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्यावर भाजपची बाजूच घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा प्रत्येक सभेत पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असं सांगत होते. तेव्हाच मोदी-शाहा यांना जाब का विचारला नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना करून त्यांना कोंडीत पकडलं होतं. या मेळाव्यानंतर राज ठाकरे यांची पहिल्यांदाच फडणवीस यांच्याशी भेट झाली. त्यामुळेही या भेटीला महत्त्व आलं आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांची राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.