AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : मनसेची राज्यभरातली महाआरती रद्द, राज ठाकरे फेसबुकवरून म्हणतात मुस्लिमांच्या सणात बाधा आणू नका

राज्यात होणारी उद्याची मनसेची महाआरती रद्द करण्यात आली आहे. तशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवरून दिली आहे. उद्या ईद आहे, आपल्याला कुणाच्याही सणात बाधा आणायची नाही, अशी फेसबुक पोस्ट राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलीय.

Raj Thackeray : मनसेची राज्यभरातली महाआरती रद्द, राज ठाकरे फेसबुकवरून म्हणतात मुस्लिमांच्या सणात बाधा आणू नका
मनसे प्रमुख राज ठाकरेना पोलिसांची नोटीसImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 3:39 PM

मुंबईराज्यात होणारी उद्याची मनसेची महाआरती (Mns MahaAarti) रद्द करण्यात आली आहे. तशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी फेसबुकवरून दिली आहे. उद्या ईद (Ramzan Eid) आहे, आपल्याला कुणाच्याही सणात बाधा आणायची नाही, अशी फेसबुक पोस्ट राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलीय. राज ठाकरे यांनी काल औरंगाबादेत एक लक्ष्यवेधी सभा घेतली. त्यावर अजून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. या सभेत त्यांनी पुन्हा मशीदीवरील भोंग्यांना टार्गेट केले. तसेच ईद होईपर्यंत भोंगे उतरले ठीक नाहीतर मशीदीसमोर अजानच्या वेळी दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लागलीच पाहिजे असा इशारा दिला आणि त्यानंतर पुन्हा या वादात आणखी एक ठिणगी पडली. तसेच अक्षयतृतीयच्या सणाला राज्यभर मनसेकडून महाआरती करण्यात येत होती. मात्र उद्याच ईदही असल्याही ही महाआरती रद्द करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे.

पोस्टमध्ये काय संदेश?

राज ठाकरेंनी एक फेसबुक पोस्ट केली आहे, त्यात त्यांनी लिहलं आहे, “उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत मी त्याबाबत बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करु नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणताही बाधा आणायची नाही. भोंग्याचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याच्याबाबत नेमकं पुढे काय करायचं हे मी उद्या माझ्या ट्विटरद्वारे आपल्यासमोर मांडेन. तुर्तास एवढच!” अशा आशयाची फेसबुक पोस्ट आज राज ठाकरेंनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

मनसैनिकांत संभ्रम निर्माण होणार?

राज ठाकरेंची गुढी पाडव्याची सभा पार पडल्यापासून या मुद्द्यावरून जोरदार वाद सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणीन अजानच्या वेळी मनसेकडून हनुमान चालीसाही लावण्यात आली. त्यानंतर राज ठाकरेंनी पुन्हा काल सरकारला औरंगाबादेत इशारा दिला. त्यानंतर मनसैनिक सज्ज होते. मात्र राज ठाकरेंच्या या संदेशामुळे आता मनसैनिकात संभ्रम निर्माण होणार का? हेही पाहण महत्वाचं ठरणार आहे. औरंगाबादेतल्या कालच्या सभेत राज ठाकरे बोलत असतानाच नेमकी त्यावळी अजान सुरू झाल्याचेही दिसून आले, त्यावेळी राज ठाकरेंनी पोलिसांना ते तातडीने बंद करण्याचं आवाहनही केले. त्यानंतर राज ठाकरेंचा रोख हा स्पष्ट झाला होता. मात्र आता पुढची भूमिका उद्या कळवेन म्हटल्याने आता पुन्हा या प्रकरणात कोणतं नवं ट्विस्ट येणार का? अशाही राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.