राहुल गांधींचं सावरकरांबाबत विधान, “काळे झेंडे दाखवा”, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्याचे आदेश दिलेत.

राहुल गांधींचं सावरकरांबाबत विधान, काळे झेंडे दाखवा, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 1:29 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना काळे झेंडे दाखवण्याचे आदेश दिलेत. राहुल गांधी यांनी विनायक सावरकर (Vinayak Savarkar) यांच्याबाबत केलेल्या विधानावरून मनसे आक्रमक झाली आहे.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा उद्या बुलढाण्यात असणार आहे.या ठिकाणी राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांना जमा होण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेत. शेगावला जा आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवा असे आदेश राज ठाकरेंनी दिलेत.

राहुल गांधी यांचं विधान काय?

भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्यावर टीका केली. सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा खरे सावरकर सगळ्यांसमोर आले. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे.तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेन, असं म्हणत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केलीय.

उद्धव ठाकरेंची भूमिका

उद्धव ठाकरे यांनीही राहुल गांधींच्या विधानाला असहमती दर्शवली आहे. सावरकरांचं देशासाठीचं योगदान अमुल्य आहे. त्यांचा हिंदुत्वाचा विचार काल, आज आणि उद्याही आम्हाला आदरणीय आहे. त्यांच्याबद्दल आमच्या मनात कायम आदरच आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

फडणवीसांकडून निषेध

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या विधानाचा निषेध केलाय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा विचार जमीनीत गाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असं फडणवीस म्हणालेत.

Non Stop LIVE Update
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'.
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र...
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र....
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ.
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण.
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल.
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण.
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?.
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन.
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?.
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश.