AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे बॅकफुटवर? उद्या पुढील दिशा स्पष्ट करणार!

भोंग्याच्या विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या माध्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन बॅकफुटवर गेले का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

Raj Thackeray : मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे बॅकफुटवर? उद्या पुढील दिशा स्पष्ट करणार!
राज ठाकरे, मनसे अध्यक्षImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 3:50 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेत महाविकास आघाडी सरकारला अल्टिमेटम दिला. राज ठाकरेंच्या आक्रमकतेपुढे शिवसेना (Shivsena) आणि सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. त्यातच औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी 4 तारखेपासून मशिदींच्या भोंग्यांसमोर (Loudspeaker on Mosque) लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याचे आदेशच मनसैनिकांना दिले. मात्र, राज ठाकरे यांनी आज एक फेसबूक पोस्ट करत रमजान ईद म्हणजेच उद्या राज्यभरात मनसेकडून होणार महाआरती रद्द केलीय. इतकंच नाही तर भोंग्याच्या विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या माध्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन बॅकफुटवर गेले का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट

‘उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करु नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन’, असं राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे स्पष्ट केलं आहे.

हे सुद्धा वाचा

भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे अधिक आक्रमक

राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेत मशिदींवरील भोंग्याचा अधिक आक्रमकपणे मांडला. राज ठाकरे भोंग्यावरून आक्रमकपणे बोलत असतानाच अजान सुरू झाली. त्यामुळे राज ठाकरे थोडे थांबले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना अजान बंद करण्याची विनंती केली. आताच्या आता जाऊन तात्काळ अजान बंद करा. त्यांच्या तोंडात बोळा कोंबा. त्यांना सरळ भाषेत कळत नसेल तर काय ते होऊन जाऊ द्या. महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे हे दाखवून देऊ, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

सभेच्या वेळी बांग देत असतील तर त्यांच्या तोंडात बोळा कोंबा. आताच्या जाऊन हे पहिल्यांदा बंद करा. त्यांना जर सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊन जाऊ देत. तुम्ही अजिबात शांत बसता कामा नये. संभाजी नगर पोलिसांना हात जोडून विनंती करतो. परत सांगतोय. ऐकत नसतील तर महाराष्ट्रातील मनगटात काय ताकद आहे हे दाखवू. देशवासियांना विनंती आहे की, मागचा पुढचा विचार करू नका. भोंगे उतरलेच पाहिजे. सर्व धर्मीयांच्या स्थळांवरचे भोंगे उतरलेच पाहिजे. पण आधी मशिदीवरचे नंतर मंदिरावरचे. अभी नही तो कभी नही. हवं तर पोलिसांची परवानगी घ्या. त्यांना परवानगी द्यावीच लागते. परवानगी घेऊन जोरात हनुमान चालिसाचं पठण कराल. हा सामाजिकदृष्टया प्रलंबित प्रश्न मार्गी लावा. हातभार लावाल. ही विनंती करतो, असं आवाहन राज ठाकरे यांनी रविवारी केलं होतं.

एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी.
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.