मतदान संपल्यानंतर राज ठाकरे पुन्हा कडाडले, गाफील राहू नका!
मुंबई : लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार न उतरवताही, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात लोकसभेचं रणांगण धगधगतं ठेवलं. ‘मोदी-शाह मुक्त भारत’ असा नारा देत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. दहा मॅरेथॉन सभा घेत राज ठाकरेंनी राजकारण ढवळून काढलं आणि सत्ताधारी भाजप-शिवसेनेला धडकी भरवली. निवडणुका संपल्यानंतर राज ठाकरे काहीसे शांत झाले, असे वाटताच पुन्हा एकदा […]
मुंबई : लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार न उतरवताही, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात लोकसभेचं रणांगण धगधगतं ठेवलं. ‘मोदी-शाह मुक्त भारत’ असा नारा देत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. दहा मॅरेथॉन सभा घेत राज ठाकरेंनी राजकारण ढवळून काढलं आणि सत्ताधारी भाजप-शिवसेनेला धडकी भरवली. निवडणुका संपल्यानंतर राज ठाकरे काहीसे शांत झाले, असे वाटताच पुन्हा एकदा दुष्काळाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे मैदानात उतरण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
महाराष्ट्र दिनाच्या सदिच्छा देण्यासाठी राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यातून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत, राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील दुष्काळ स्थितीबद्दलही चिंता व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती प्रचंड गंभीर आहे. अनेक तज्ञांच्या मते तर यावेळचा दुष्काळ 1972 च्या दुष्काळापेक्षा गंभीर आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी राज्यातील दुष्काळाची स्थिती आपल्या पत्रकातून मांडली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी दुष्काळासोबत बेरोजगारी हा विषय जोडत, यातलं गांभीर्य दाखवून दिले आहे.
“दुष्काळी परिस्थितीवर महाराष्ट्र सैनिक लक्ष ठेवून आहेत आणि जिथे जिथे सरकारी यंत्रणा त्यांच्या कामात दिरंगा ई करत आहेत, तिथे तिथे मनसे दणका देत आहेत. पण हे दोन्ही विषय इतके गंभीर आहेत की, तमाम मराठी जनांनी जनमताचा रेटा उबारायला हवा. आणि त्यासाठी ‘महाराष्ट्र दिन’ याशिवाय दुसरा उत्तम दिवस असूच शकत नाही. माझी महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे, की दुर्लक्ष करु नका, गाफील राहू नका.” असे राज ठाकरे यांनी आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून म्हटले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील चारही टप्पे पूर्ण झाले असून, 23 मे रोजी निकाल लागणार आहे. प्रचार, मतदान संपल्यानंतर महाराष्ट्रातील नेते काहीसे शांत झाले आहेत. मात्र, एकीकडे मतदान संपल्या संपल्या त्याच दिवसी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दुष्काळ दौऱ्यावर गेले, तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी दुष्काळाच मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे येत्या काळात राज ठाकरे दुष्काळाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे.